टोकियो - संपूर्ण जगासाठी हा काळ खूप कठिण आहे. कारण प्रत्येक जण कोरोनाविरोधात लढत आहे. कोरोनामुळे लाखो लोकांचा जीव गेला आहे. अशा या जीवघेण्या महामारीत एक अॅथलेटिक्स सराव सोडून कोरोना रुग्णांची सेवा करत होता. या अॅथलेटिक्सने आता टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे.
इराणचा नेमबाज जावेद फोरौघी याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात सुवर्णपदक जिंकलं आहे. सुवर्णपदक विजेता जावेद स्वत:ला देशाचा सैनिक मानतो. कोरोना महामारीत इतर नेमबाज टोकियो ऑलिम्पिकचा सराव करत होते. तेव्हा जावेद कोरोनाग्रस्त असलेल्या रुग्णांची सेवा करत होता.
इराण पहिला चॅम्पियन जावेद
41 वर्षीय जावेदने शनिवारी 244.5 गुणांसह ऑलिम्पिक रेकॉर्ड नोंदवत सुवर्णपदक जिंकले. या स्पर्धेत भारताचा सौरभ चौधरी देखील होता. पण सौरभला फायनलमध्ये सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले.
हेही वाचा - Tokyo Olympics : पिस्तूलने मनु भाकरला दिला दगा, पदकाचे स्वप्न भंगले
हेही वाचा - मोफत पिझ्झा ते ही आयुष्यभर; रौप्य पदक विजेती मीराबाई चानूसाठी पिझ्झा कंपनीची घोषणा