ETV Bharat / sports

Kamalpreet Kaur suspended : डिस्कस थ्रोमध्ये भारताला मोठा धक्का: डोपिंग चाचणीत नापास झाल्यामुळे कमलप्रीत कौरवर तात्पुरती बंदी - जागतिक अ‍ॅथलेटिक्स

कमलप्रीत कौर डोपिंग चाचणीत नापास झाल्यामुळे तिच्यावर तात्पुरती बंदी घालण्यात आली ( Kamalpreet Kaur suspended ) आहे. तसेच डिस्कस थ्रोमध्ये भारतीय आशांना मोठा धक्का बसला आहे. जर कमलप्रीत स्वत:ला निर्दोष सिद्ध करू शकली नाही, तर तिच्यावर चार वर्षांची बंदी घातली जाऊ शकते.

Kamalpreet Kaur
Kamalpreet Kaur
author img

By

Published : May 5, 2022, 10:36 PM IST

नई दिल्ली: थाळी फेकपट्टू ( डिस्कस थ्रोअर ) कमलप्रीत कौर हिला अ‍ॅथलेटिक्स इंटिग्रिटी युनिट ( Athletics Integrity Unit ) ने बंदी घातलेल्या स्टेरॉईड चाचणीत पॉझिटिव्ह आल्यानंतर तात्पुरते निलंबित केले आहे. कमलप्रीत यामध्ये दोषी आढळल्यास तिला जास्तीत जास्त चार वर्षांसाठी निलंबित केले जाऊ शकते.

जागतिक अ‍ॅथलेटिक्स (संचालक मंडळ) ने बुधवारी ट्विट केले, AIU ने भारताच्या डिस्कस थ्रोअर कमलप्रीत कौरला तिच्या शरीरात प्रतिबंधित पदार्थ (स्टेनोझोलॉल) उपस्थिती/वापरल्यामुळे तात्पुरते निलंबित केले आहे. हा पदार्थ जागतिक अ‍ॅथलेटिक्स अँटी-डोपिंग नियमांचे उल्लंघन करणारा आहे. जागतिक अ‍ॅथलेटिक्स डोपिंगशी संबंधित प्रकरणात चाचणी पूर्ण होईपर्यंत खेळाडूला तात्पुरते निलंबित करते.

अ‍ॅथलेटिक्स इंटिग्रिटी युनिट ही जागतिक अ‍ॅथलेटिक्सने स्थापन केलेली स्वतंत्र संस्था आहे. त्यांनी पंजाबच्या या 26 वर्षीय खेळाडूला नोटीस बजावून आपली बाजू मांडण्यास सांगितले आहे. राष्ट्रीय विक्रमधारक कमलप्रीतने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहावे स्थान पटकावले होते. कमलप्रीत कौनने गेल्या वर्षी पतियाळा येथे 66.59 मीटर डिस्कस फेकून राष्ट्रीय विक्रम केला होता. यापूर्वी 2018 मध्ये तिची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी 61.04 मीटर होती.

पटियाला येथे राष्ट्रीय विक्रमासह पहिले स्थान मिळवणारी कमलप्रीत टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली होती. तिने टोकियो येथे पात्रता फेरीत 64.00 मीटर डिस्कस फेकली होती. तिने अंतिम फेरीत 63.70 मीटरसह सहावे स्थान पटकावले. यावर्षी, कौरने मार्चमध्ये तिरुअनंतपुरम येथे झालेल्या इंडियन ग्रांप्री स्पर्धेत 61.39 मीटर डिस्कस फेकून सुवर्णपदक जिंकले होते.

गुडघ्याच्या दुखापतीमुळे कमलप्रीत कौरने गेल्या महिन्यात फेडरेशन कप सीनियर अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भाग घेतला नव्हता. त्याचवेळी तिरुवनंतपुरम येथे झालेल्या इंडियन ग्रांप्रीमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. तिच्या नावावर 65.06 मीटरपर्यंत डिस्कस फेकण्याचा राष्ट्रीय विक्रम आहे, जो तिने गेल्या वर्षी प्रस्थापित केला होता.

हेही वाचा - Ipl 2022 Updates : मुंबई इंडियन्स संघात टायमल मिल्सच्या जागी 'या' खेळाडूची वर्णी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.