काठमांडू - दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत 'खो-खो'मध्ये भारतीय पुरुष संघापाठोपाठ महिला संघानेही सुवर्णपदकाची कमाई केली. महिलांनी अंतिम सामन्यात यजमान नेपाळचा १७-०५ असा १ डाव १२ गुणांनी पराभव केला. दरम्यान, भारतीय पुरुष आणि महिला संघाने खो-खो मध्ये लागोपाठ दुसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकले आहे.
भारतीय पुरुष संघाने बांगलादेशचा १६-९ असा १ डाव आणि ७ गुणांनी पराभव केला. भारताच्या विजयाचा हिरो ठरला दीपक माधव. त्याने बांगलादेशच्या ५ गड्यांना बाद केले. तसेच त्याने दोन मिनिटाहून अधिक वेळ धावून काढला. बांगलादेशला रौप्य तर यजमान नेपाळला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
-
#TeamIndia Women's #KhoKho team put up a brilliant show to land another🥇into India's medal count at the 13th #SouthAsianGames, having defeated home team Nepal by 17-5! #Kudos Girls 👏 pic.twitter.com/nZTNXih2MA
— Team India (@WeAreTeamIndia) December 4, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#TeamIndia Women's #KhoKho team put up a brilliant show to land another🥇into India's medal count at the 13th #SouthAsianGames, having defeated home team Nepal by 17-5! #Kudos Girls 👏 pic.twitter.com/nZTNXih2MA
— Team India (@WeAreTeamIndia) December 4, 2019#TeamIndia Women's #KhoKho team put up a brilliant show to land another🥇into India's medal count at the 13th #SouthAsianGames, having defeated home team Nepal by 17-5! #Kudos Girls 👏 pic.twitter.com/nZTNXih2MA
— Team India (@WeAreTeamIndia) December 4, 2019
तर दुसरीकडे भारतीय महिला संघाकडून आक्रमणात कर्णधार नसरीन व काजल भोरने प्रत्येकी ५-५ खेळाडूंना बाद करत भारताचा विजय सुकर केला. महिला वर्गात नेपाळला रौप्य तर बांगलादेशला कांस्य पदक जिंकता आले. दरम्यान, भारतीय महिला संघाने उपांत्य फेरीत श्रीलंकेचा २५-०१ असा ०१ डाव आणि २४ गुणांनी पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली होती.
हेही वाचा - दक्षिण आशियाई स्पर्धेत भारताचा डंका, दुसऱ्या दिवशी ११ सुवर्णांसह जिंकली २७ पदके
हेही वाचा - दक्षिण आशियाई स्पर्धा : पहिल्याच दिवशी भारताने जिंकली १४ पदके
हेही वाचा - VIDEO : १४ वर्षीय मुलीचा धोबीपछाड, मुलाला कुस्तीत मात देत जिंकलं पारितोषिक