पतियाळा - भारताचा गोळाफेकपटू ताजिंदरपाल सिंग तूर टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे. त्याने इंडियन ग्रां. प्रि. अॅथलेटिक्स स्पर्धेच्या चौथ्या टप्प्यात नव्या राष्ट्रीय विक्रम स्थापित केला.
ताजिंदरने इंडियन ग्रा. प्रि. अॅथलेटिक्समध्ये २१.४९ मीटर अंतरावर गोळा फेकून ऑलिम्पिक पात्रतेच्या (२१.१० मीटर) निकषांची पूर्तता केली. ताजिंदरने २०१९ मधील स्वत:चा २०.९२ मीटरचा विक्रम मोडीत काढला.
महिला रिले संघ ऑलिम्पिकसाठी अपात्र -
हिमा दास, द्युती चंद, एस. धनलक्ष्मी आणि अर्चना सुशींद्रन यांचा समावेश असलेल्या महिला रिले संघाने ४३.३७ सेकंद अशी वेळ नोंदवली. पण ते टोकियो ऑलिम्पिकची पात्रता गाठण्यात अपयशी ठरले. भारताच्या 'ब' संघाने ४८.०२ सेकंद वेळ नोंदवली. द्युतीने १०० मीटर शर्यत ११.१७ सेकंद वेळेसह जिंकली. मात्र तिची ऑलिम्पिक पात्रतेची संधी (११.१५ सेकंद) हुकली.
हेही वाचा - Tokyo Olympics साठी १० हजार प्रेक्षकांना स्टेडियममध्ये येण्यास परवानगी
हेही वाचा - वेटलिफ्टर हबबार्ड ठरणार ऑलिम्पिकमध्ये भाग घेणारी पहिली ट्रान्सजेंडर खेळाडू