ETV Bharat / sports

FIFA Best Player 2022 : 'हे' खेळाडू फिफाच्या अंतिम फेरीत; पुरस्कारांची होणार घोषणा - फिफा 2022

2022मध्ये अर्जेंटिनाने फ्रान्सचा पराभव करून 36 वर्षांनी फिफा विश्वचषक जिंकला होता. अंतिम फेरीत अर्जेंटिनाने फ्रान्सचा ४-२ असा पराभव केला.

FIFA Best Player 2022
हे खेळाडू फिफाच्या अंतिम फेरीत
author img

By

Published : Feb 12, 2023, 10:06 AM IST

जिनिव्हा : फिफा 2022च्या सर्वोत्कृष्ट पुरुष फुटबॉल खेळाडू पुरस्कारासाठी लिओनेल मेस्सी, किलियन एमबाप्पे आणि करीम बेंझेमा यांची अंतिम फेरीत निवड करण्यात आली आहे. फिफाने शुक्रवारी ही घोषणा केली. लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखाली गेल्या वर्षी कतार येथे झालेल्या फिफा विश्वचषकात अर्जेंटिना अंतिम फेरीत फ्रान्सचा पराभव करून विश्वविजेता ठरला होता. मेस्सीने स्पर्धेचा गोल्डन बॉल जिंकला, तर त्याचा पॅरिस सेंट-जर्मेनचा सहकारी एमबाप्पे याने आठ गोलांसह गोल्डन बूट जिंकला.

सर्वोत्कृष्ट महिला खेळाडूंची देखील निवड : रियल माद्रिदसह यूईएफए चॅम्पियन्स लीग आणि ला लीगा विजेतेपद जिंकल्याबद्दल किलियन एमबाप्पेचा देशबांधव बेन्झेमाने गेल्या वर्षी बॅलोन डी'ओर पुरस्कार जिंकला होता, अशी बातमी शिन्हुआ वृत्तसंस्थेने दिली. पण दुखापतीमुळे विश्वचषक खेळू शकला नाही. सर्वोत्कृष्ट महिला खेळाडूच्या पुरस्कारासाठी स्पेनची ॲलेक्सिया पुटेलास, इंग्लंडची फॉरवर्ड बेथ मीड आणि अमेरिकेची ॲलेक्स मॉर्गन यांची निवड झाली.

  • The Best FIFA Women's Player Award finalists are in 👀

    🇪🇸 Alexia Putellas
    🏴󠁧󠁢󠁥󠁮󠁧󠁿 Beth Mead
    🇺🇸 Alex Morgan pic.twitter.com/BC7ZckhPwb

    — Just Women’s Sports (@justwsports) February 10, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

या पुरस्कारांची घोषणा : सर्वोत्कृष्ट पुरुष आणि महिला खेळाडू, सर्वोत्कृष्ट पुरुष आणि महिला प्रशिक्षक, सर्वोत्कृष्ट पुरुष आणि महिला गोलकीपर आणि 2022 चा सर्वोत्कृष्ट गोल या पुरस्कारांची घोषणा 27 फेब्रुवारी रोजी पॅरिसमध्ये केली जाईल. 2021-22 हंगामातील त्यांच्या सर्वोत्तम कामगिरीच्या आधारे महिला खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक, कर्णधार, पत्रकार यांचा समावेश असलेल्या तज्ञांच्या पॅनेलने एकूण 14 खेळाडूंमधून तीन महिला खेळाडूंची निवड केली.

टूर्नामेंटचा खेळाडू पुरस्कार : फॉरवर्ड बेथ मीडने इंग्लंडच्या बहुप्रतिक्षित ट्रॉफीसह युरो 2022 गोल्डन बूट आणि टूर्नामेंटचा खेळाडू पुरस्कार जिंकला. त्याचवेळी, पुटेलास बॅलन डी'ओर दोनदा जिंकणारी पहिली महिला ठरली. 33 वर्षीय मॉर्गनने सॅन दिएगोसाठी 17 सामन्यांत 15 गोल केले. मीडने बीबीसी स्पोर्ट्स पर्सनॅलिटी ऑफ द इयर हा पुरस्कार जिंकला, ती इतिहासातील पहिली महिला फुटबॉलपटू आहे.

एमबाप्पेने अनेक विक्रम : एम्बाप्पेने वयाच्या ५ व्या वर्षी फुटबॉल खेळायला सुरुवात केली. तो आपला आदर्श ख्रिस्तियानो रोनाल्डो मानतो. फ्रान्सच्या सर्वकालीन सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो सहाव्या क्रमांकावर आहे. त्याच्या नावावर 36 गोल आहेत. विश्वचषकातील 14 सामन्यांत त्याने 12 गोल केले आहेत. तसेच सलग दोनदा विश्वचषकाची अंतिम फेरी गाठणारा तो दुसरा खेळाडू आहे. एम्बाप्पेने त्याच्या क्लब आणि देशासाठी 363 सामन्यांमध्ये 253 गोल केले आहेत.

हेही वाचा : FIFA Club World Cup : रिअल माद्रिद आणि अल हिलाल रंगतदार फायनल लढत; प्रक्षेपण थेट युकेतील फिफाच्या प्लॅटफाॅर्मवरून

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.