गुवाहाटी - ‘खेलो इंडिया’ युवा क्रीडा स्पर्धेच्या तिसऱ्या पर्वाचे गुवाहाटी येथे शानदार उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्राच्या जिम्नॅस्टिक्सपटूंनी सुवर्णकामगिरी केली. १७ वर्षांखालील गटात अस्मी बदाडे हिने रिदमिकमध्ये तर १४ वर्षीय मानस मनकवळे याने पॉमेल हॉर्स प्रकारत सुवर्णपदक मिळवले आहे.
हेही वाचा - IND Vs SL : टीम इंडियाने श्रीलंकेला 'धो डाला'.. नवीन वर्षातील पहिला मालिकाविजय
ठाण्यातील ज्ञानसाधना विद्यामंदिरची विद्यार्थीनी असलेल्या अस्मीने ४३.८० गुणांची कमाई केली. तर, श्रेया बंगाळेले रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. मानसने १०.६५ गुण मिळवत आपल्या गटात अव्वल स्थान राखले. अस्मी ही प्रथमच खेलो इंडिया स्पधेर्साठी पात्र ठरली होती. तिने यापूर्वी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये ५ सुवर्ण व एक रौप्यपदक जिंकले आहे.