पटियाला - भारताची भालाफेकपटू अन्नू राणी हिने फेडरेसन चषक राष्ट्रीय अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी नव्या राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली. मात्र ऑलिम्पिकचा पात्रता निकष तिला पार करता आला नाही.
राणीने सोमवारी ६३.२४ मीटर अशी कामगिरी करत स्वत:चाच ६२.४३ मीटरचा विक्रम मोडीत काढला. तिने २०१९ साली दोहामध्ये ६२.४३ मीटर भाला फेकला होता. दरम्यान, टोक्यो ऑलिम्पिकसाठी पात्रता निकष ६४ मीटर इतका आहे. पण तिला हे निकष पार करता आलेले नाही.
-
Many congratulations to #TOPSAthlete #AnnuRani for setting a new national record of 63.24m in the women’s javelin throw at the Federation Cup in Patiala. She surpassed her own previous record of 62.43m set in 2019.
— SAIMedia (@Media_SAI) March 15, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
*Subject to ratification pic.twitter.com/1EDvh9JLP8
">Many congratulations to #TOPSAthlete #AnnuRani for setting a new national record of 63.24m in the women’s javelin throw at the Federation Cup in Patiala. She surpassed her own previous record of 62.43m set in 2019.
— SAIMedia (@Media_SAI) March 15, 2021
*Subject to ratification pic.twitter.com/1EDvh9JLP8Many congratulations to #TOPSAthlete #AnnuRani for setting a new national record of 63.24m in the women’s javelin throw at the Federation Cup in Patiala. She surpassed her own previous record of 62.43m set in 2019.
— SAIMedia (@Media_SAI) March 15, 2021
*Subject to ratification pic.twitter.com/1EDvh9JLP8
अन्नू राणीने २०१४ अशियाई क्रीडा स्पर्धेत कास्य तर अशियाई चॅम्पियनशीप २०१९ मध्ये रौप्य पदक जिंकलं आहे. ती राष्ट्रीय स्पर्धेत उत्तर प्रदेशचे नेतृत्व करत आहे.
राजस्थानच्या संजना चौधरीने ५४.५५ मीटर भाला फेकत स्पर्धेत दुसरे स्थान मिळवले. तर हरियाणाची कुमारी शर्मिला ५०.७८ मीटरसरह तिसऱ्या स्थानी राहिली. या स्पर्धेत ८ खेळाडूंनी भाग घेतला होता.
'यांनी' केली सुवर्णपदकाची कमाई
सविता पाल हिने १० हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक मिळवले. किरण बलियान याने गोळाफेक प्रकारात १६.४५ मीटर अशी कामगिरी करत सुवर्णपदक प्राप्त केले. तामिळनाडूच्या रॉसी पौलराजने पोलव्हॉल्ट प्रकारात ३.८० मीटर इतकी कामगिरी नोंदवत सुवर्णपदकाची कमाई केली.
हेही वाचा - ऑलिम्पिक क्वालिफायर ट्रायलमधून सुशील कुमारची माघार
हेही वाचा - भवानी देवी ऑलिम्पिकसाठी पात्र, ठरली भारताची पहिली तलवारबाज