भोपाळ : भारतीय नेमबाज सिफ्त कौरने रविवारी मध्य प्रदेशातील नेमबाजी अकादमी रेंजमध्ये आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पोर्ट फेडरेशन (ISSF) रायफल/पिस्तूल विश्वचषक 2023 मध्ये महिलांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन्स (3P) स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. मेडिकलची विद्यार्थिनी असलेली सिफ्त महिलांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन्स (3P) मध्ये सध्याची राष्ट्रीय विजेती आहे. सिफ्त कौरने आठ रैंगिंग राउंडमध्ये 403.9 गुण मिळवले. विशेष म्हणजे हे तिचे पहिले विश्वचषक पदक आहे.
-
Zhang Qiongyue of 🇨🇳 wins the women’s 50m rifle 3 positions 🥇 while Aneta Brabcova (left) of 🇨🇿 wins 🥈 & Sift Kaur Samra of 🇮🇳 wins 🥉. Congratulations!@issf_official #ISSFWorldCupBhopal #Shooting #AirRifle #3P #Bhopal #India pic.twitter.com/lusKRDd8b0
— NRAI (@OfficialNRAI) March 26, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Zhang Qiongyue of 🇨🇳 wins the women’s 50m rifle 3 positions 🥇 while Aneta Brabcova (left) of 🇨🇿 wins 🥈 & Sift Kaur Samra of 🇮🇳 wins 🥉. Congratulations!@issf_official #ISSFWorldCupBhopal #Shooting #AirRifle #3P #Bhopal #India pic.twitter.com/lusKRDd8b0
— NRAI (@OfficialNRAI) March 26, 2023Zhang Qiongyue of 🇨🇳 wins the women’s 50m rifle 3 positions 🥇 while Aneta Brabcova (left) of 🇨🇿 wins 🥈 & Sift Kaur Samra of 🇮🇳 wins 🥉. Congratulations!@issf_official #ISSFWorldCupBhopal #Shooting #AirRifle #3P #Bhopal #India pic.twitter.com/lusKRDd8b0
— NRAI (@OfficialNRAI) March 26, 2023
पदकतालिकेत भारत दुसऱ्या स्थानावर : स्पर्धेत चीनच्या नेमबाजांनी पुन्हा शानदार खेळ दाखवत दोन सुवर्णपदके जिंकली. चीनने या स्पर्धेत आठ सुवर्ण, दोन रौप्य आणि दोन कांस्य पदकांसह अव्वल स्थान पटकावले आहे. तर भारत सात पदकांसह दुसऱ्या स्थानावर आहे. महिलांच्या 3P मधील दिवसाच्या पहिल्या पदक स्पर्धेत, चीनच्या झांग कियांग्यूने सुवर्णपदकाच्या लढतीत चेक प्रजासत्ताकच्या अनिता ब्रॅबकोव्हाचा 16 - 8 असा पराभव केला. आदल्या दिवशी, झांगने रँकिंग फेरीत 414.7 गुण कमावत अव्वल स्थान पटकावले होते. तर अनिताने रँकिंग फेरीत 411.3 गुणांसह दुसरे स्थान पटकावले होते.
भारताने आत्तापर्यंत सात पदकं जिंकली : या स्पर्धेतील भारताचे हे सातवे पदक आहे. भारतीय नेमबाजांनी एक सुवर्ण (पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये सरबज्योत सिंग), एक रौप्य आणि पाच कांस्यपदके जिंकली आहेत. तर मानिनी कौशिकने थोड्या फरकाने पात्रता गमावली. ती 584 गुणांसह 9 व्या, तर अंजुम मौदगिल 583 गुणांसह 13 व्या स्थानावर राहिली. क्रमवारीत गुणांसाठी खेळत असलेल्या श्रींका सदंगी आणि आशी चौकसे यांनी अनुक्रमे 582 आणि 581 गुण नोंदवले.
चीनच्या झांग झुमिंगला सुवर्णपदक : चीनच्या झांग झुमिंगने 40 शॉट आठ सेटच्या पदक लढतीत 35 गुणांसह सुवर्णपदक जिंकले. टोकियो ऑलिम्पिक फायनल आणि कैरो वर्ल्ड रौप्यपदक विजेता फ्रेंच खेळाडू क्लेमेंट बासागुएटने 34 हिट्ससह रौप्य पदक जिंकले. क्रिस्टियनने 21 हिट्ससह तिसरे स्थान मिळवले. भारताचा सिद्धू भारतीयांमध्ये रँकिंग फेरीच्या सामन्यांसाठी पात्र होण्याच्या सर्वात जवळ पोहोचला आहे. तो 581 गुणांसह नवव्या स्थानावर राहिला. अनिश भानवाला 581 गुणांसह 10 व्या स्थानावर तर अंकुर गोयलने 574 गुणांसह 14 वे स्थान पटकावले. भावेश शेखावतने 578 आणि मनदीप सिंगने 575 गुण कमावले.