नवी दिल्ली : भारतीय संघाने महिला अंडर-19 विश्वचषक 2023 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा सात गडी राखून पराभव करत विजयी सुरुवात केली आहे. कर्णधार शेफाली वर्मा आणि सलामीवीर श्वेता सेहरावत यांच्या झंझावाती खेळीच्या जोरावर भारतीय संघाने यजमान दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात दमदार विजय मिळवला.
-
Vice-captain Shweta Sehrawat scored a superb 9️⃣2️⃣* off just 57 deliveries and bagged the Player of the Match Award 🙌🏻#TeamIndia off to a winning start in the #U19T20WorldCup with a 7️⃣-wicket victory against South Africa 👏🏻👏🏻
— BCCI Women (@BCCIWomen) January 14, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Scorecard 👉https://t.co/sA6ECj9P1O… pic.twitter.com/iCSDHYLYji
">Vice-captain Shweta Sehrawat scored a superb 9️⃣2️⃣* off just 57 deliveries and bagged the Player of the Match Award 🙌🏻#TeamIndia off to a winning start in the #U19T20WorldCup with a 7️⃣-wicket victory against South Africa 👏🏻👏🏻
— BCCI Women (@BCCIWomen) January 14, 2023
Scorecard 👉https://t.co/sA6ECj9P1O… pic.twitter.com/iCSDHYLYjiVice-captain Shweta Sehrawat scored a superb 9️⃣2️⃣* off just 57 deliveries and bagged the Player of the Match Award 🙌🏻#TeamIndia off to a winning start in the #U19T20WorldCup with a 7️⃣-wicket victory against South Africa 👏🏻👏🏻
— BCCI Women (@BCCIWomen) January 14, 2023
Scorecard 👉https://t.co/sA6ECj9P1O… pic.twitter.com/iCSDHYLYji
सात षटकांत 77 धावांची भागीदारी : दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पाच गड्यांच्या मोबदल्यात 166 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने विजयाचे लक्ष्य 16.3 षटकांत 3 गडी गमावून पूर्ण केले. भारतीय संघाकडून सर्वाधिक धावा सलामीवीर श्वेता सेहरावत (नाबाद 92) आणि कर्णधार शेफाली वर्मा (45 धावा) यांनी केल्या. भारतासाठी शेफाली आणि सेहरावत यांनी सात षटकांत 77 धावांची भागीदारी केली.
-
FIFTY! 👏🏻#TeamIndia vice-captain Shweta Sehrawat brings up a fine half-century as we move to 121/2 after 11 overs.
— BCCI Women (@BCCIWomen) January 14, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Follow the match👉https://t.co/sA6ECj9P1O……#U19T20WorldCup pic.twitter.com/FHvSC4qij5
">FIFTY! 👏🏻#TeamIndia vice-captain Shweta Sehrawat brings up a fine half-century as we move to 121/2 after 11 overs.
— BCCI Women (@BCCIWomen) January 14, 2023
Follow the match👉https://t.co/sA6ECj9P1O……#U19T20WorldCup pic.twitter.com/FHvSC4qij5FIFTY! 👏🏻#TeamIndia vice-captain Shweta Sehrawat brings up a fine half-century as we move to 121/2 after 11 overs.
— BCCI Women (@BCCIWomen) January 14, 2023
Follow the match👉https://t.co/sA6ECj9P1O……#U19T20WorldCup pic.twitter.com/FHvSC4qij5
हेही वाचा : Hockey World Cup 2023 : नेदरलँड्सने मलेशियाचा 4-0 ने धुव्वा उडवला
21 चेंडू शिल्लक असताना विजय मिळाला : भारतासाठी 51 टी-20, दोन कसोटी आणि 21 एकदिवसीय सामने खेळलेली शेफाली आज उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसली. तिने दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना हवे तसे फटके मारले. आपल्या खेळीत तिने नऊ चौकार आणि एक षटकार लगावला. ती आठव्या षटकात फिरकी गोलंदाज मियाने स्मितच्या गोलंदाजीवर बाद झाली. त्याचवेळी सेहरावतने 57 चेंडूत 20 चौकार मारले. या दोघींनी 21 चेंडू शिल्लक असताना भारताला विजय मिळवून दिला. शेफालीने गोलंदाजीतही कमाल केली आणि दोन बळी घेतले.
दक्षिण आफ्रिकेच्या 166 धावा : दक्षिण आफ्रिकेसाठी सिमोन लॉरेन्सने 44 चेंडूत 61 आणि एलँड्री जॅन्से व्हॅन रेन्सबर्गने 13 चेंडूत 23 धावा केल्या. डावखुरा फिरकीपटू सोनम यादवने रेन्सबर्गला रिचा घोषच्या हाताने विकेटच्या मागे झेलबाद करून भारताला पहिले यश मिळवून दिले. यानंतर शेफालीने ओलुहले सियोला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. 17 व्या षटकात लॉरेन्स धावबाद झाल्यानंतर यजमान संघाच्या धावगतीवर अंकुश आला. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पाच गड्यांच्या मोबदल्यात 166 धावा केल्या.
हेही वाचा : Hockey World Cup 2023 : भारताची विजयी सुरुवात, स्पेनचा 2-0 ने केला पराभव