ETV Bharat / sports

भारतीय बॉक्सिंग फेडरेशनचे कार्यकारी संचालक आर. के. सचेती यांचे कोरोनाने निधन - rk sacheti

भारतीय बॉक्सिंग फेडरेशनचे कार्यकारी संचालक आर. के. सचेती यांचे कोरोनामुळे निधन झाले.

bfi-executive-director-rk-sacheti-passes-away-to-due-to-covid-19
भारतीय बॉक्सिंग फेडरेशनचे कार्यकारी संचालक आर. के. सचेती यांचे कोरोनाने निधन
author img

By

Published : May 4, 2021, 7:15 PM IST

मुंबई - भारतीय बॉक्सिंग फेडरेशनचे कार्यकारी संचालक आर. के. सचेती यांचे कोरोनामुळे निधन झाले. भारतीय बॉक्सिंग फेडरेशनने ट्विट करुन याची माहिती दिली. सचेती यांच्या निधनाने भारतीय बॉक्सिंग क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. देशाचे केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजेजू यांनीही ट्विट करत आर. के. सचेती यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केलं आहे.

सचेती यांना कोरोनाची लागण झाली होती आणि त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. पण मंगळवारी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्याची प्राणज्योत मालवली. दरम्यान, सचेती यांनी जागतिक बॉक्सिंगमध्ये भारताला वेगळी ओळख निर्माण करुन दिली आहे. त्यांनी भारताला या क्रीडा प्रकारात मजबूत करण्यात महत्वाची भूमिका निभावलेली आहे.

भारतीय बॉक्सिंग फेडरेशनचे कार्यकारी संचालक आर. के. सचेती यांचे निधन झाले आहे. त्यांच्या जाण्याने क्रीडा क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. आर. के. सचेती एक उत्तम प्रशासक आणि आयओसी ऑलम्पिक टास्क फोर्सचे सदस्य होते. त्यांनी भारतीय क्रीडा क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे, अशा आशयाचे ट्विट बॉक्सिंग फेडरेशनने केलं आहे.

  • With a deep sense of sorrow & grief, we inform you that Mr. RK Sacheti,ED(BFI) left for heavenly abode today morning, creating a huge void in the sports world. He has been a Member IOC Olympic Task Force & an able administrator with an unparalleled contribution to 🇮🇳 Sports. #RIP pic.twitter.com/QMNcKZCiND

    — Boxing Federation (@BFI_official) May 4, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा - आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवणारे सॉफ्टबॉल खेळाडू गुणवत्ता शिष्यवृत्तीपासून वंचित; राज्य सरकारने दखल घेण्याची मागणी

हेही वाचा - सुवर्ण पदक विजेती बॉक्सर अल्फिया पठाणचे नागपूर नगरीत स्वागत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.