मेलबर्न - यंदाच्या पुरूषांच्या टी-२० क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेनंतर, ऑस्ट्रेलियाला अजून एका विश्वकरंडक स्पर्धेचे यजमानपद मिळणार आहे. २०२२ मध्ये ऑस्ट्रेलिया महिला बास्केटबॉल विश्वकरंडक स्पर्धेचे आयोजन करणार आहे. ऑस्ट्रेलियासह रशियादेखील यजमानपदाच्या शर्यतीत सहभागी होता.
बास्केटबॉलची फिबाच्या या संघटनेने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलिया दुसऱ्यांदा महिला बास्केटबॉल विश्वचषक आयोजित करेल. यापूर्वी १९९४ मध्ये त्यांनी विश्वकरंडक स्पर्धेचेदेखील आयोजन केले होते.
ही १० दिवसीय स्पर्धा सप्टेंबर-ऑक्टोबर २०२२ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या सिडनी शहरात खेळवली जाईल. या विश्वचषक स्पर्धेदरम्यान एकूण ३८ सामने खेळले जातील आणि १२ संघांचे १४४ खेळाडू या स्पर्धेत भाग घेतील.