दोहा : 2022 च्या फिफा विश्वचषक (FIFA World Cup 2022) स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात सौदी अरेबियाकडून 1-2 असा अपमानास्पद पराभव झाल्यानंतर लिओनेल मेस्सी आणि अर्जेंटिना यांच्यावर मेक्सिकोविरुद्धच्या लढतीत दडपण आहे. हा सामना शनिवारी (27 नोव्हेंबर 2022) रात्री 12:30 वाजता सुरू होईल. (argentina vs mexico preview)
-
#Qatar2022
— Selección Argentina 🇦🇷 (@Argentina) November 26, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Nuestro vestuario desde todos los ángulos 🇦🇷 ¡Los colores más lindos! 😍 pic.twitter.com/LEGEy8VbJE
">#Qatar2022
— Selección Argentina 🇦🇷 (@Argentina) November 26, 2022
Nuestro vestuario desde todos los ángulos 🇦🇷 ¡Los colores más lindos! 😍 pic.twitter.com/LEGEy8VbJE#Qatar2022
— Selección Argentina 🇦🇷 (@Argentina) November 26, 2022
Nuestro vestuario desde todos los ángulos 🇦🇷 ¡Los colores más lindos! 😍 pic.twitter.com/LEGEy8VbJE
पहिल्या सामन्यातील पराभवानंतर अर्जेंटिनाचे स्पर्धेतील अस्तित्व धोक्यात आले असून त्यांना आपल्या आशा जिवंत ठेवायच्या असतील तर मेक्सिकोविरुद्ध पुनरागमन करावे लागेल. अन्यथा त्यांना स्पर्धेतून बाहेर पडावे लागेल. मेस्सी म्हणाला, आम्ही नेहमीच म्हणत आलो की आम्ही प्रत्येक सामन्यात जिंकण्याचा प्रयत्न करू.
अर्जेंटिनाचा माजी खेळाडू आणि माजी प्रशिक्षक गेरार्डो मार्टिनो हे आता मेक्सिकोचे प्रशिक्षक असून प्रतिस्पर्धी संघाला धक्का देण्याची रणनीती ते तयार करत आहेत. मार्टिनोने 2014 ते 2016 या कालावधीत अर्जेंटिनाचे नेतृत्व केले होते. त्याने पायउतार होण्यापूर्वी कोपा अमेरिका फायनलमध्ये पराभवाचा सामना केला. आता तो प्रशिक्षक म्हणून मेक्सिकोला अंतिम 16 मध्ये नेण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी त्याला अर्जेंटिनाविरुद्ध कोणतीही कसर सोडता येणार नाही. मेक्सिकोला 2006 आणि 2010 मध्ये अर्जेंटिनाकडून नॉकआऊट स्टेजच्या सामन्या पराभव पत्कारावा लागला आहे.