नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटपटू आणि कसोटीत अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) गेल्या काही काळापासून टीम इंडियातून बाहेर आहे. खराब खेळीमुळे त्याला बांगलादेशविरुद्धच्या संघात घेण्यात आले नाही. पण (Ranji Trophy 2022) रणजी ट्रॉफी 2022 च्या दुसऱ्याच सामन्यात द्विशतक झळकावून रहाणेने कसोटी संघात पुनरागमन करण्याचा दावा बळकट केला आहे.
हैदराबादविरुद्ध मुंबईच्या दुसऱ्या रणजी सामन्यात रहाणेने 253 चेंडूत 79.05 च्या स्ट्राईक रेटने 200 धावा केल्या. (Rahane scored double century) या द्विशतकात रहाणेने 26 चौकार आणि 3 षटकार ठोकले. रहाणे 204 धावा करून बाद झाला. (Rahane double century in first class) अजिंक्य रहाणेशिवाय सरफराज खाननेही या सामन्यात शतक झळकावले आहे. तत्पूर्वी, मुंबईकडून यशस्वी जैस्वालने 162 धावा आणि सूर्यकुमार यादवने 90 धावा केल्या, सलामीवीर पृथ्वी शॉ केवळ 19 धावा करू शकला.
भारतीय संघाचा स्टार फलंदाज अजिंक्य रहाणे 2020-21 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका 2-1 ने जिंकल्यानंतर अतिशय खराब फॉर्ममध्ये झुंजत होता. त्याच्या बॅटने धावा काढल्या नाहीत, त्यामुळे तो दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी बांगलादेश दौऱ्यावर जाऊ शकला नाही. जानेवारीत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत तो शेवटचा खेळला होता. या सामन्याच्या दोन्ही डावात रहाणेला विशेष काही करता आले नाही आणि त्याने एकूण 10 धावा केल्या.