मुंबई - ऑलिंपिक प्राथमिक पात्रता स्पर्धेत भारत विरुध्द पाकिस्तान संघामध्ये लढत होण्याची शक्यता होती. मात्र, ड्रॉ मध्ये भारताचे प्रतिस्पर्धी रशिया ठरला. तर पाकिस्तानला नेदरलँडविरुध्द खेळावे लागणार आहे. ऑलिंपिक पात्रतेच्या अंतिम टप्प्याच्या लढतीचा ड्रॉ आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाच्या मुख्यालयात काढण्यात आला.
ड्रॉ नुसार पहिल्यास भारत विरुध्द रशिया ही लढत एकतर्फी होण्याची शक्यता आहे. कारण भारतीय संघ जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर आहेत. तर रशिया २२ व्या क्रमांकावर विराजमान आहे. तसेच भारताने ऑलिंपिक पात्रतेच्या पहिल्या टप्प्यात रशियाला १०-० ने पराभूत केले होते.
हेही वाचा - राष्ट्रीय क्रीडा दिवस : हॉकीचे 'जादुगार' मेजर ध्यानचंद जन्मदिन
महत्वाचे म्हणजे, रशियाचा संघ या ड्रॉसाठी पात्र ठरलेला नव्हता. ऐनवेळी इजिप्तने माघार घेतली आणि रशियाचा या ड्रॉमध्ये समावेश करण्यात आला. रशियाला पराभूत करून ऑलिंपिकसाठी पात्र ठरण्याची औपचारिकता भारतीय हॉकी संघास करावी लागणार आहे.
हेही वाचा - टोकियो ऑलिम्पिकसाठी भारतीय हॉकी संघ करणार 'हे' काम
भारतीय महिला संघासमोर खडतर आव्हान असेल. भारतीय महिलांना अमेरिकेसोबत दोन हात करावे लागणार आहे. दरम्यान, भारत आणि अमेरिका महिला हॉकी संघातील विश्वकरंडक स्पर्धेतील लढत १-१ बरोबरीत सुटली होती.