ETV Bharat / sports

CHAMPIONS LEAGUE: रिअल माद्रिदचा यजमान एजाक्सवर विजय

author img

By

Published : Feb 14, 2019, 11:01 AM IST

अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात रिअलने अखेरच्या क्षणात सामन्यावर पकड घेताना एजाक्सवर २-१ अशा गोल फरकाने विजय मिळवला.

रिअल माद्रिद

अॅमस्टरडॅम - युएफा चॅम्पियन्स लीगच्या अंतिम-१६ च्या फेरीत यजमान एजाक्ससमोर गतविजेता रिअल माद्रिदचे मोठे आव्हान होते. अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात रिअलने अखेरच्या क्षणात सामन्यावर पकड घेताना एजाक्सवर २-१ अशा फरकाने विजय मिळवला.

एजाक्सने सामन्याच्या सुरुवातीपासून आक्रमक खेळ केला. एजाक्सने याचा फायदा होता होता राहिला. ३७ व्या मिनिटाला एजाक्सने गोल केला. परंतु, व्हीएआरने (VAR) हा गोल अवैध ठरवला. पहिले सत्र गोलशून्य बरोबरीत सुटले. दुसऱया सत्रात माद्रिदच्या खेळाडूंनी आक्रमक पवित्रा घेतला.

सामन्याच्या ६० व्या मिनिटाला व्हिनिशियस ज्यूनियरने चांगला खेळ करत करिम बेंझेमाला पास दिला. या पासवर बेंझेमाने कोणतीही चुक न करता गोल करत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. परंतु, ही आघाडी फार काळ टिकली नाही. ७५ व्या मिनिटाला एजाक्सकडून हाकिम झीयेचने गोल करत १-१ अशी बरोबरी साधली. सामना संपायला काही मिनिटे बाकी असताना रिअलकडून बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरलेल्या मार्को असेन्सियोने ८७ व्या मिनिटाला गोल करत २-१ असा विजय निश्चित केला.

Intro:Body:

Real madrid beat Ajax in uefa champions league

CHAMPIONS LEAGUE: रिअल माद्रिदचा यजमान एजाक्सवर विजय 

अॅमस्टरडॅम - युएफा चॅम्पियन्स लीगच्या अंतिम-१६ च्या फेरीत यजमान एजाक्ससमोर गतविजेता रिअल माद्रिदचे मोठे आव्हान होते. अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात रिअलने अखेरच्या क्षणात सामन्यावर पकड घेताना एजाक्सवर २-१ अशा गोल फरकाने विजय मिळवला.

एजाक्सने सामन्याच्या सुरुवातीपासून आक्रमक खेळ केला. एजाक्सने याचा फायदा होता होता राहिला. ३७ व्या मिनिटाला एजाक्सने गोल केला. परंतु, व्हीएआरने (VAR) हा गोल अवैध ठरवला. पहिले सत्र गोलशून्य बरोबरीत सुटले. दुसऱया सत्रात माद्रिदच्या खेळाडूंनी आक्रमक पवित्रा घेतला. 

सामन्याच्या ६० व्या मिनिटाला व्हिनिशियस ज्यूनियरने चांगला खेळ करत करिम बेंझेमाला पास दिला. या पासवर बेंझेमाने कोणतीही चुक न करता गोल करत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. परंतु, ही आघाडी फार काळ टिकली नाही. ७५ व्या मिनिटाला एजाक्सकडून हाकिम झीयेचने गोल करत १-१ अशी बरोबरी साधली. सामना संपायला काही मिनिटे बाकी असताना रिअलकडून बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरलेल्या मार्को असेन्सियोने ८७ व्या मिनिटाला गोल करत २-१ असा विजय निश्चित केला. 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.