ETV Bharat / sports

इंग्लिश फुटबॉल लीगचे 17 जण कोरोना पॉझिटिव्ह - English football league update

ईएफएलने आपल्या संकेतस्थळावर ही माहिती दिली. 28 आणि 29 मेला 24 क्लबमधील 1058 जणांची कोरोनाची चाचणी घेण्यात आली होती. पुढच्या महिन्यात ईएफएल लीग सुरू होण्याची अपेक्षा आहे.

English football league confirms 17 positive cases of coronavirus
इंग्लिश फुटबॉल लीगचे 17 जण कोरोना पॉझिटिव्ह
author img

By

Published : May 31, 2020, 7:20 PM IST

लंडन - इंग्लिश फुटबॉल लीगमधील (ईएफएल) नुकत्याच झालेल्या कोरोनाच्या चाचणीमध्ये 17 जण पॉझिटिव्ह सापडले आहेत. चॅम्पियनशिपच्या आठ क्लबमधील 10 तर, लीग-2च्या तीन क्लबमधील सात लोक पॉझिटिव्ह आढळल्याचे ईएफएलने रविवारी सांगितले.

ईएफएलने आपल्या संकेतस्थळावर ही माहिती दिली. 28 आणि 29 मेला 24 क्लबमधील 1058 जणांची कोरोनाची चाचणी घेण्यात आली होती. पुढच्या महिन्यात ईएफएल लीग सुरू होण्याची अपेक्षा आहे.

इंग्लिश प्रीमियर लीग (ईपीएल) 17 जूनपासून पुन्हा सुरू होईल. पहिला सामना अ‍ॅस्टन व्हिला आणि शेफील्ड युनायटेड आणि दुसरा सामना मँचेस्टर सिटी आणि अर्सेनल यांच्यात होईल. एक वृत्तसंस्थेच्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. तर, इटलीची फुटबॉल लीग सेरी-ए 20 जूनपासून सुरू होईल. इटलीच्या सरकारने लीग पुन्हा सुरू करण्यास मान्यता दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.