मॅनचेस्टर - मॅनचेस्टर युनायटेडने जुवेंटस क्लबकडून सुपरस्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोला ट्रान्सफर केले आहे. याची माहिती मॅनचेस्टर युनायटेडने आज दिली. युनायटेडने रोनाल्डोसोबत दोन वर्षासाठी करार केला आहे. रोनाल्डो आणखी एक वर्ष हा करार वाढवू शकतो.
ट्रान्सफर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ख्रिस्तियानो रोनाल्डो म्हणाला की, मॅनचेस्टर यूनायटेड असा क्लब आहे, ज्याच्याबद्दल माझ्या मनात नेहमी विशेष स्थान राहिले आहे. मी त्यांच्या सोबत जोडला गेल्याची माहिती मला शुक्रवारी मिळाली. मी ओल्ड ट्रॅफर्डमधील स्टेडियममध्ये खेळण्यासाठी आतूर आहे. तसेच मी आंतरराष्ट्रीय स्पर्धेनंतर संघासोबत जोडला जाण्यासाठी उत्सुक आहे. मला आशा आहे की, आमच्यासाठी आगामी हंगाम चांगला राहिल.
मॅनचेस्टर युनायटेड क्लबने 36 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डोला जुवेंटसकडून मोठी रक्कम देत आपल्या संघात घेतले आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी हा करार झाला. यानंतर तब्बल 12 वर्षानंतर रोनाल्डो मॅनचेस्टर युनायटेड संघात खेळताना पाहायला मिळेल.
ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या उपस्थितीत मॅनचेस्टर युनायटेड संघाने तीन वेळा प्रीमियर लीगचे विजेतेपद पटकावले होते. यासोबत ते एकदा युईएफए चॅम्पियनशीपचे विजेते देखील ठरले होते. रोनाल्डोने मॅनचेस्टर युनायटेडसाठी 292 सामन्यात 118 गोल केले होते. दरम्यान, ख्रिस्तियानो रोनाल्डो न्यू कॅसल युनायटेडविरोधातील सामन्यात डेब्यू करू शकतो.
हेही वाचा - Ind vs Eng : पॉल कॉलिंगवूड यांनी भारतीय संघाच्या वापसीबद्दल काय म्हटलं?
हेही वाचा - Tokyo Paralympics : उंच उडीत मरियप्पन थंगवेलूने रौप्य आणि शरद कुमारने जिंकलं कास्य पदक