ETV Bharat / sports

भारतीय दिग्गज फुटबॉलपटू सईद शाहिद हकिम यांचे निधन - SS Hakim dead news

भारताचे माजी फुटबॉलपटू सईद शाहिद हकिम याचं निधन झालं. ते 82 वर्षांचे होते.

1960 Rome Olympian and national football coach SS Hakim dead
भारतीय दिग्गज फुटबॉलपटू सईद शाहिद हकिम यांचे निधन
author img

By

Published : Aug 22, 2021, 5:30 PM IST

मुंबई - भारताचे माजी फुटबॉलपटू सईद शाहिद हकिम याचं निधन झालं. ते 82 वर्षांचे होते. आज रविवारी कर्नाटकच्या गुलबर्गा येथील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. याची माहिती हकिम यांच्या कुटुंबियांनी दिली.

हृदयविकाराचा झटका आल्यामुळे सईद शाहिद हकिम यांना गुलबर्गा येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते पाच दशकाहून अधिक काळ भारतीय फुटबॉल सोबत जोडले गेले होते.

द्रोणाचार्य पुरस्कार विजेता सईद शाहिद हकिम हे 1982 साली झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत दिवंगत पी के बॅनर्जी यांचे सहाय्यक प्रशिक्षक राहिले आणि मर्डेका कप दरम्यान, नॅशनल संघाचे त्यांनी प्रशिक्षकपद भूषवलं होतं. स्थानिक स्तरावर त्यांनी आपली छाप सोडली. त्यांच्या मार्गदर्शनात महिंद्रा अँड महिंद्रा आताचा महिंद्रा यूनायटेड क्लबने 1988 साली बलाढ्य वेस्ट बंगालचा पराभव करत डुरंड कप जिंकला होता. याशिवाय ते सालगावकर यांचे देखील कोच होते.

सईद शाहिद हकिम 1960 रोम ऑलिम्पिकमध्ये सहभागी भारतीय संघाचे सदस्य होते. तसेच आंतरराष्ट्रीय रेफरी म्हणून देखील त्यांनी काम पहिलं आहे. त्यांना देशाचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार ध्यान चंद पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ते भारतीय वायु दलात माजी स्क्वाड्रन लीडर होते. याशिवाय त्यांनी भारतीय क्रीडा प्राधिकरणमध्ये निदेशक म्हणून देखील काम पाहिलं.

हेही वाचा - Tokyo Paralympics : टोकियोत तिरंगा फडकवण्यासाठी पॅरा अॅथलिट सज्ज, पाहा भारताचे संपूर्ण शेड्यूल

हेही वाचा - सचिनची नव्हे तर 'या' फलंदाजांची वाटायची भीती, मुरलीधरनची कबुली

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.