केपटाऊन : ऑस्ट्रेलियाविरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील 8व्या महिला टी 20 विश्वचषक अंतिम सामना न्यूलँड्सच्या मैदानावर संध्याकाळी 6:30 वाजता सुरू होणार आहे. मेग लॅनिंगच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियन संघ विश्वचषक खेळत आहे. विजेतेपद मिळवून इतिहास रचण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघ तयार आहे. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेचा संघ प्रथमच अंतिम सामना खेळणार आहे. ऑस्ट्रेलियाला घरच्या मैदानावर कांगारूंना हरवण्याची संधी आहे. पण ते इतके सोपे होणार नाही. एकीकडे मेग लॅनिंग आणि दुसरीकडे सुने ल्यूसच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेचा संघ आणि ऑस्ट्रेलियाचा संघ खेळणार आहे.
ऑस्ट्रेलियाने बहुतांश सामने जिंकले : दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत एकूण 6 टी 20 सामने खेळले गेले आहेत. ज्यात बहुतांश सामने ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला आहे. दोन्ही संघांमध्ये 15 एकदिवसीय सामनेही झाले आहेत. त्यापैकी 14 सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले आहेत. महिला टी 20 विश्वचषक 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाने आपले पाचही सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने तीन विजय मिळवले आहेत. दक्षिण आफ्रिकेला दोन सामन्यांत पराभव पत्करावा लागला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या लॉरा वोल्वार्ड, ताजमिन ब्रिट्स आणि मारिजन कॅप अंतिम फेरीत चांगली कामगिरी करू शकतात. या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू (44 च्या सरासरीने 176) सामन्याचे चित्र बदलू शकतो.
दक्षिण आफ्रिका संघ : दक्षिण आफ्रिका संघात क्लो ट्रायॉन (उपकर्णधार), सुने लुस (कर्णधार), ताजमिन ब्रिट्स, अॅनेके बॉश, अॅनेरी डर्कसेन, नादिन डी क्लर्क, शबनीम इस्माईल, लारा गुडॉल, मारिजन कॅप, सिनालोआ जाफ्ता (विकेट कीपर, फलंदाज), मसाबता क्लास, अयाबोंगा खाका, डेल्मी टकर, नॉनकुलुलेको मलाबा, लॉरा वोल्वार्ड या खेळाडूंचा समावेश आहे. ऑस्ट्रेलिया संघ : ऑस्ट्रेलिया संघात अॅलिसा हिली (उपकर्णधार, विकेटकीपर/फलंदाज ), मेग लॅनिंग (कर्णधार), ऍशले गार्डनर, डी'आर्सी ब्राउन, हेदर ग्रॅहम, किम गर्थ, जेस जोनासेन, ग्रेस हॅरिस, ताहलिया मॅकग्रा, अलाना किंग, एलिस पेरी, बेथ मुनी (विकेट कीपर, फलंदाज) अॅनाबेल सदरलँड, जॉर्जिया वेअरहॅम, मेगन शुट या खेळाडूंचा समावेश आहे.
उपांत्यपूर्व सामना : आयसीसी महिला विश्वचषक 2023 मध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात उपांत्यपूर्व सामना खेळवला गेला. भारताने या सामन्यात शेवटपर्यंत जोरदार लढत दिल्याच पहायला मिळाले. परंतु, दुर्दैवाने टीम इंडियाचा पराभव झाला. अवघ्या 5 धावांनी भआरतीय संघाचा पराभव झाला. कर्णधार हरमनप्रीत आणि जेमिमाह रॉड्रीग्सने सामन्यात जिंवतपणा आणण्याचा भरपूर प्रयत्न केला होता.