आकलंड - आयपीएलमध्ये सहभागी असलेले न्यूझीलंड कसोटी संघातील खेळाडू या आठवड्यात मालदीवहून इंग्लंडला रवाना होणार आहेत. इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात दोन कसोटी सामन्याची मालिका होणार आहे. या मालिकेआधी खेळाडूंना काही दिवस क्वारंटाईन राहावं लागणार आहे. मालदीवहून इंग्लंडमध्ये पोहोचताच त्या खेळाडूंना क्वारंटाईन करण्यात येणार आहे.
आयपीएलमध्ये केन विल्यमसन, मिशेल सँटनर, कायले जेमिसन आणि फिजिओ टॉमी सिमसेक हे सहभागी झाले होते. आयपीएल स्पर्धा कोरोनामुळे स्थगित करण्यात आली. त्यामुळे ते मालदीवला गेले आहेत. तिथून ते इंग्लंडला रवाना होणार आहेत. सर्व खेळाडू सद्यघडीला मालदीवमध्ये क्वारंटाईन आहेत.
न्यूझीलंड संघाचे प्रशिक्षक गॅरी स्टीड यांनी सांगितलं की, 'मला अद्याप याबद्दल संपूर्ण माहिती नाही. पण ते १५ ते १७ मे दरम्यान मालदीवहून इंग्लंडला रवाना होण्याची योजना आखत आहेत. मला एवढीच माहिती आहे की, इंग्लंड बोर्ड मालिकेसाठी घेतलेल्या योजनावर काम काम करत आहे.'
दरम्यान, उभय संघातील पहिला कसोटी सामना २ जूनपासून तर दुसरा १० जूनपासून सुरू होणार आहे.
हेही वाचा - IPL २०२१ : भारताच्या काही वरिष्ठ खेळाडूंना निर्बंध आवडत नाहीत, मुंबईच्या प्रशिक्षकाचा गौप्यस्फोट
हेही वाचा - भारताचा माजी गोलंदाज आर. पी. सिंग याच्या वडिलांचे कोरोनामुळे निधन