ETV Bharat / sports

WI VS PAK : सामना सुरू असताना विडींजचे २ खेळाडू अचानक मैदानावर कोसळले, स्ट्रेचरवरून नेले थेट रुग्णालयात

west-indies-vs-pakistan-t20-chinelle-henry-and-chedean-nation-fell-unconscious-on-field-in-antigua
WI VS PAK : सामना सुरू असताना विडींजचे २ खेळाडू अचानक मैदानावर कोसळले, स्ट्रेचरवरून नेले थेट रुग्णालयात
author img

By

Published : Jul 3, 2021, 6:57 PM IST

अँटिगा - महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यादरम्यान, दोन खेळाडू बेशुद्ध होऊन मैदानात पडले. दोन्ही महिला खेळाडू १० मिनिटात एकानंतर एक बेशुद्ध झाल्या. दोघींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. माध्यमानी दिलेल्या वृत्तानुसार, आता त्या दोन्ही खेळाडूंची प्रकृती ठीक आहे. दरम्यान ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

पाकिस्तान महिला क्रिकेट संघ वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे. उभय संघात या दौऱ्यातील दुसरा टी-२० सामना अँटिगा येथे रंगला होता. या सामन्यातील पाकिस्तानच्या फलंदाजी दरम्यान, वेस्ट इंडिजची वेगवान गोलंदाज चिनेले हेनरी अचानक बेशुद्ध झाली. तिला तात्काळ मैदानाबाहेर घेऊन जाण्यात आले. त्यानंतर थोड्याच वेळात फलंदाज चेडियन नेशन देखील बेशुद्ध झाली. यामुळे त्या दोघांनी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, दोन्ही महिला खेळाडू कोणत्या कारणाने अचानक बेशुद्ध झाल्या, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

वेस्ट इंडिज क्रिकेटचे मुख्य प्रशिक्षक कर्टनी वॉल्श यांनी सांगितलं की, आम्ही या घटनेची संपूर्ण माहितीची वाट पाहत आहोत. ही घटना कशी आणि का झाली याची संपूर्ण माहिती आल्यानंतरच यावर भाष्य करता येईल.

वेस्ट इंडिजचा डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे विजय -

वेस्ट इंडिजच्या महिला संघ त्या दोन खेळाडूंच्या जागेवर सब्सटिट्यूट खेळाडूसह मैदानात उतरले. अशात पावसाने हजेरी लावली. तेव्हा वेस्ट इंडीजला डकवर्थ लुईस नियमानुसार ७ धावांनी विजयी घोषित करण्यात आले. वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ६ बाद १२५ धावा केल्या होत्या. पावसामुळे पाकिस्तान संघाला विजयासाठी १८ षटकात ११ धावांचे आव्हान मिळाले. प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानचा संघ ६ बाद १०३ धावा करू शकला.

दुसरीकडे पाकिस्तान महिला क्रिकेट संघाची कर्णधार जावेरिया खान हिने वेस्ट इंडिज संघाचे मनोबल वाढवले. इतकी मोठी घटना घडलेली असताना देखील सामना सुरू ठेवला यात विंडीज विजयी ठरला. पाकिस्तानच्या संघाच्या प्रार्थना चिनेले आणि चेडियनसोबत असल्याचे तिने म्हटलं आहे.

हेही वाचा - गुड न्यूज! स्थानिक क्रिकेटला होणार सुरुवात, BCCIने जाहीर केले वेळापत्रक

हेही वाचा - Vitality Blast : टी-२०मध्ये एकाच दिवशी ३ गोलंदाजांनी घेतली हॅट्ट्रीक, पाहा व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.