साउथम्पटन - जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यावर न्यूझीलंड संघाने पकड मजबूत केली आहे. न्यूझीलंडच्या शिस्तबद्ध माऱ्यासमोर भारताचा पहिला डाव २१७ धावांवर आटोपला आहे. त्यानंतर न्यूझीलंडने चहापानापर्यंत बिनबाद ३६ अशी सावध सुरूवात केली आहे. न्यूझीलंडच्या फलंदाजीदरम्यान भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली भरमैदानात भांगडा करताना पाहायला मिळाला. त्याच्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
-
Virat Kohli #WTC21 pic.twitter.com/RVyMwZXx9T
— All About Cricket (@allaboutcric_) June 20, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Virat Kohli #WTC21 pic.twitter.com/RVyMwZXx9T
— All About Cricket (@allaboutcric_) June 20, 2021Virat Kohli #WTC21 pic.twitter.com/RVyMwZXx9T
— All About Cricket (@allaboutcric_) June 20, 2021
भारताचा पहिला डाव २१७ धावांत आटोपला...
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना साउथम्पटनमध्ये रंगला आहे. न्यूझीलंडने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा न्यूझीलंडच्या भेदक माऱ्यासमोर भारताचा पहिला डाव २१७ धावांवर आटोपला आहे. आज तिसऱ्या दिवशी भारताच्या एकाही फलंदाजाला न्यूझीलंडच्या गोलंदाजीचा धैर्याने सामना करता आला नाही. काइल जेमिसनने ५ गडी बाद करत भारताच्या डावाला खिंडार पाडले.
काइल जेमिसनच्या नावे खास विक्रम...
आयसीसीने आयोजित केलेली जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा मागील दोन वर्षांपासून खेळवली जात आहे. काइल जेमिसनने या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खास विक्रम नोंदवला आहे. अंतिम सामन्यात भारतीय संघाविरुद्ध पाच बळी घेत या स्पर्धेत तो सर्वाधिक वेळा पाच बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. जेमिसनने कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत पाचव्यांदा पाच गडी बाद केलेले आहेत. या यादीत त्याने भारताचे फिरकीपटू आर. अश्विन, अक्षर पटेल आणि ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लॉयनला यांना मागे टाकलं आहे. या तिघांच्या नावे कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत प्रत्येकी चार वेळा पाच विकेटची नोंद आहे.
हेही वाचा - WTC Final: टीम इंडिया २१७ धावांत गारद, जेमिसनचा 'पंच'
हेही वाचा - Live Ind vs NZ WTC Final: न्यूझीलंडची सावध सुरूवात, चहापानापर्यंत बिनबाद ३६ धावा