सिडनी - क्रिकेटमध्ये अनेक वाद पाहायला मिळतात. प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंमध्येही अनेकवेळा जुंपल्याचे व्हिडिओ आपण पाहिले आहेत. असाच एक व्हिडिओ बिग बॅश लीग स्पर्धेतून समोर आला. पर्थ स्कॉर्चर्स आणि सिडनी सिक्सर्स या दोन संघात सामना सुरू असताना एका खेळाडूने चक्क पंचांना अपशब्द केला. त्यामुळे त्या खेळाडूला कारवाईला सामोरे जावे लागले.
पर्थ स्कॉर्चर्सचा अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्शने पंचांना अपशब्द केला. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. सामन्याच्या १३व्या षटकात पंचांनी मार्शला बाद दिले. त्यानंतर त्याने आपला राग व्यक्त केला आणि पॅव्हेलियनमध्ये जाताना पंचांबद्दल टिपणी केली. या घटनेबद्दल मार्शला ऑस्ट्रेलिया कोड ऑफ कंडक्टद्वारे तब्बल ५००० डॉलर्सचा दंड ठोठावण्यात आला आहे.
मॅच रेफरी बॉब स्ट्रॅटफोर्ड यांनी आचारसंहितेच्या कलम २.८ अंतर्गत मार्शला दंड ठोठावला आहे. मार्शनेही आपली चूक कबूल केली आहे.
हेही वाचा - भारताच्या वेगवान गोलंदाजाने केले मुंडण..वाचा कारण