रेनजिओरा (न्यूझीलंड) : भारतीय महिला संघाची स्टार फलंदाज स्मृती मंधानाला ( Star batsman Smriti Mandhana ) दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सराव सत्रात दुखापत झाली होती. या सामन्यात तिच्या डोक्याला चेंडू लागला होता. परंतु आता स्मृती मंधाना आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक ( ICC Women Cricket World Cup ) स्पर्धेत खेळण्यासाठी फिट असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
पहिल्या सराव सामन्यात शबनीम इस्माईलचा बाऊन्सर डोक्याला लागल्याने मंधानाला दुखापत झाल्याने ( Injury to Smriti Mandhana ) रिटायर्ड हर्ट व्हावे लागले होते. भारताने हा सामना दोन धावांनी जिंकला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ( International Cricket Council ) अहवालानुसार, या घटनेनंतर, 25 वर्षीय मंधानाची टीमच्या डॉक्टरांनी तपासणी केली आणि सुरुवातीला तिला खेळत राहण्यासाठी तंदुरुस्त घोषित करण्यात आले. दीड षटकांनंतर आणखी एका तपासणीनंतर रिटायर्ड हर्ट झाली.
रिपोर्टमध्ये सांगण्यात आले की, त्यावेळी वैद्यकीय कर्मचार्यांच्या म्हणण्यानुसार, डाव्या हाताच्या फलंदाजाला कनकशनची कोणतीही चिन्हे दिसत नव्हती. मंधाना चांगल्या फॉर्ममध्ये आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यात तिने 20 वे अर्धशतक झळकावले. मंधानाने आतापर्यंत 64 एकदिवसीय सामन्यांमध्ये चार शतकांच्या मदतीने 2 हजार 461 धावा केल्या आहेत.
भारतीय संघाला अजून एक सराव सामना वेस्ट इंडिज विरुद्ध खेळायचा ( India practice match against West Indies ) आहे. त्यानंतर भारतीय संघ आपली विश्वचषक मोहिम सुरु करेल. ज्यामध्ये 6 मार्चला भारताचा पाकिस्तान विरुद्ध सामना होणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सराव सामन्यात हरमनप्रीत कौरचे शतक आणि यास्तिका भाटियाच्या 58 धावांच्या जोरावर भारताने 9 बाद 244 धावा केल्या. डावखुरी फिरकीपटू राजेश्वरी गायकवाडने 46 धावांत चार बळी घेतले.