ETV Bharat / sports

सचिन तेंडुलकरने केलं रक्तदान, सांगितला जवळच्या व्यक्तीचा आलेला अनुभव

भारताचा माजी दिग्गज क्रिकेटर सचिन तेंडुलकरने आज जागतिक रक्तदाता दिनाचे औचित्य साधून रक्तदान केले.

author img

By

Published : Jun 14, 2021, 6:59 PM IST

sachin tendulkar spotted-donating blood-outside-his-house
सचिन तेंडुलकरने केलं रक्तदान, सांगितला जवळच्या व्यक्तीचा आलेला अनुभव

मुंबई - भारताचा माजी दिग्गज क्रिकेटर सचिन तेंडुलकरने आज जागतिक रक्तदाता दिनाचे औचित्य साधून रक्तदान केले. रक्तदान केल्यानंतर त्यानं इतरांना देखील रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे. तेंडुलकरने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करून रक्तदान केल्याची माहिती दिली आहे.

सचिन व्हिडिओमध्ये म्हणतो की, 'काही दिवसांपूर्वी माझ्या जवळच्या एका नातेवाईकांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. ही मोठी शस्त्रक्रिया होती. यात खूप रक्त गेलं. त्यामुळे त्याला रक्ताची गरज भासली. रक्त शोधणे हे आमच्यासाठी एक जटिल आव्हान होतं. पण एका अनोळख्या व्यक्तिने रक्त देऊन त्याचा जीव वाचवला. आम्ही जीव वाचल्याने खूप खुश झालो. मी त्या व्यक्तिचे या माध्यमातून आभार मानू इच्छितो. त्याने माझ्या नातेवाईकांचा जीव वाचवला.'

आज जागतिक रक्तदाता दिवस आहे. मी आणि माझ्या संपूर्ण टीम रक्तदान केलं आहे. मला आशा आहे की, यामुळे कोणाची तरी मदत होईल. तुम्ही देखील रक्तदान करा. हे खूप पुण्याचे काम आहे. तुम्हाला फक्त तुमच्या जवळच्या रक्तपेढीशी संपर्क करावा लागेल. ते तुम्हाला मार्गदर्शन करतील. तुम्ही नक्की रक्तदान करा, असे आवाहन देखील सचिनने या व्हिडिओच्या माध्यमातून केलं आहे.

दरम्यान, सचिनने नुकतीच कोरोनावर मात केली आणि त्यानंतर त्याने एक व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यात त्याने प्लाझ्मा दान करण्याचा निर्धार व्यक्त केला होता. सचिनने कोरोना विरुद्धच्या लढ्यात पंतप्रधान सहाय्यता निधी आणि महाराष्ट्र मुख्यमंत्री सहाय्यता निधीत प्रत्येकी २५ लाखांची मदत केली होती.

हेही वाचा - 'हे' दोन भारतीय खेळाडू न्यूझीलंडवर पडतील भारी, डेव्हिड वॉर्नरचे भाकित

हेही वाचा - सुनिल गावसकर यांनी सांगितलं सर्वात आव्हानात्मक खेळपट्टी कोणती होती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.