बर्मिंगहॅम: इंग्लंडविरुद्ध बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतने आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. पहिल्या डावात धडाकेबाज शतक झळकावल्यानंतर ऋषभने दुसऱ्या डावातही अर्धशतक झळकावून भारतीय संघाला मजबूत स्थितीत आणले. भारतीय संघाचा दुसरा डाव 81.5 षटकांत 245 धावांवर आटोपला. तसेच इंग्लंडला 378 धावांचे लक्ष्य दिली आहे. या सामन्यात ऋषभ पंतच्या नावावर दोन्ही डावात दणदणीत कामगिरीसह अनेक विक्रमही ( Wicketkeeper-batsman Rishabh Pant record ) झाले आहेत.
-
That's another half-century for @RishabhPant17 👏👏#TeamIndia now leads by 316 runs.
— BCCI (@BCCI) July 4, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Live - https://t.co/LL20D1K7si #ENGvIND pic.twitter.com/xXA2WLJcHF
">That's another half-century for @RishabhPant17 👏👏#TeamIndia now leads by 316 runs.
— BCCI (@BCCI) July 4, 2022
Live - https://t.co/LL20D1K7si #ENGvIND pic.twitter.com/xXA2WLJcHFThat's another half-century for @RishabhPant17 👏👏#TeamIndia now leads by 316 runs.
— BCCI (@BCCI) July 4, 2022
Live - https://t.co/LL20D1K7si #ENGvIND pic.twitter.com/xXA2WLJcHF
एजबॅस्टन कसोटीच्या पहिल्या डावात ऋषभ पंतने इंग्लंडवर पलटवार करत 146 धावा केल्या. ऋषभ पंतने या खेळीत 19 चौकार, 4 षटकार मारले. ऋषभ पंतने दुसऱ्या डावात 8 चौकारांसह 57 धावा केल्या. ऋषभ पंत कसोटीत शतक आणि अर्धशतक दोन्ही झळकावणारा दुसरा यष्टीरक्षक ठरला आहे.
एकाच कसोटीत शतक आणि अर्धशतक ठोकणारे भारतीय यष्टीरक्षक:
• फारुख इंजिनियर विरुद्ध इंग्लंड, ब्रेबॉर्न 1973 (121 + 66)
• ऋषभ पंत विरुद्ध इंग्लंड, एजबॅस्टन 2022 (146+57)
याशिवाय ऋषभ पंतने आणखी एक विक्रम केला, तो इंग्लंडमधील कसोटी सामन्यात परदेशी यष्टीरक्षकाकडून सर्वाधिक धावा करण्यात पहिल्या क्रमांकावर आला आहे. ऋषभ पंतने येथे 72 वर्षे जुना विक्रम मोडला आहे.
इंग्लंडमध्ये परदेशी यष्टीरक्षकाने सर्वाधिक धावा (कसोटीमध्ये)
203, ऋषभ पंत (एजबॅस्टन, 2022) 146 + 57
182, क्लाईड वॉलकॉट (लॉर्ड्स, 1950) 14,168*
भारतीय यष्टीरक्षकांची यादी पाहिली तर ऋषभ पंतच्या आधी हा विक्रम माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नावावर होता. ज्याने 2011 मध्ये या मैदानावर खेळल्या गेलेल्या कसोटीत 151 धावा (77, 74*) केल्या होत्या. एका कसोटीत भारतीय यष्टीरक्षकाकडून सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत ऋषभ पंत तिसऱ्या क्रमांकावर आहे.
-
Innings Break: #TeamIndia make 245 in their second innings. @cheteshwar1 top scores with 66 and @RishabhPant17 makes 57.
— BCCI (@BCCI) July 4, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
India have set England a target of 378 runs.
Details - https://t.co/LL20D1K7si #ENGvIND pic.twitter.com/v6ZkOYgXNq
">Innings Break: #TeamIndia make 245 in their second innings. @cheteshwar1 top scores with 66 and @RishabhPant17 makes 57.
— BCCI (@BCCI) July 4, 2022
India have set England a target of 378 runs.
Details - https://t.co/LL20D1K7si #ENGvIND pic.twitter.com/v6ZkOYgXNqInnings Break: #TeamIndia make 245 in their second innings. @cheteshwar1 top scores with 66 and @RishabhPant17 makes 57.
— BCCI (@BCCI) July 4, 2022
India have set England a target of 378 runs.
Details - https://t.co/LL20D1K7si #ENGvIND pic.twitter.com/v6ZkOYgXNq
230 धावा, बुधी कुंदरन (192, 38) विरुद्ध इंग्लंड 1964
224 धावा, एमएस धोनी (224, DNB) विरुद्ध ऑस्ट्रेलिया 2013
203 धावा, ऋषभ पंत (146, 57) विरुद्ध इंग्लंड 2022
187 धावा, फारुख इंजिनियर (121, 66) विरुद्ध इंग्लंड 1973
विशेष म्हणजे ऋषभ पंतच्या धमाकेदार खेळीच्या जोरावर भारताने एजबॅस्टन कसोटीच्या पहिल्या डावात 416 धावा केल्या. ऋषभशिवाय रवींद्र जडेजानेही 104 धावांची खेळी खेळली. इंग्लंडने पहिल्या डावात 284 धावा केल्या होत्या, यजमानांसाठी जॉनी बेअरस्टोने शतक झळकावले.
हेही वाचा - INDW vs SLW 2nd ODI : मंधाना-शेफालीच्या अर्धशतकामुळे भारताने श्रीलंकेचा 10 विकेट्सने केला पराभव