मुंबई: भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली ( Batsman Virat Kohli ) मागील दोन वर्षापासून खराब फॉर्ममधून जात आहे. तसेच नुकत्याच पार पडलेल्या आयपीएल हंगामात देखील त्याला नावाल साजेशी कामगिरी करता आली नाही. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने ( Former Australia captain Ricky Ponting ) विराट कोहलीबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. विराट कोहलीला त्याच्या फलंदाजीच्या समस्येवर स्वत:च तोडगा काढावा लागेल, असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने व्यक्त केले आहे. तसेच तो म्हणाला की तो एक उत्कृष्ट फलंदाज आहे.
पाँटिंग पुढे म्हणाला, इंडियन प्रीमियर लीग ( Indian Premier League ) मध्ये तो फॉर्ममध्ये नसल्यामुळे त्याच्यावर प्रश्न निर्माण झाले आहेत, ज्यामुळे तो अडचणीत आहे. आयपीएलमध्ये माजी कर्णधार फॉर्ममध्ये दिसत नव्हता. या मोसमात त्याच्या फॉर्ममध्ये नसल्यामुळे त्याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जिथे त्याला अनेक दिग्गजांच्या टीकेला सामोरे जावे लागले आहे. पॉन्टिंगने आयएएनएसला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, "मला खात्री आहे की एक फलंदाजी विशेषज्ञ असल्याने तो त्याच्या फलंदाजीवर काम करेल आणि लवकरच क्रिकेटमध्ये परत येईल."
यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने ( Wicketkeeper-batsman Dinesh Karthik ) इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये उत्कृष्ट कामगिरी दाखवली, ज्यामध्ये त्याने क्रिकेटच्या अनेक दिग्गजांना प्रभावित केले आणि त्याला भारतीय संघात पुनरागमन करण्यास मदत केली. आयपीएलमधील डेथ ओव्हर्समध्ये यष्टीरक्षक-फलंदाजाने शानदार खेळ केला आणि संघाला सामने जिंकून दिलो, असे पाँटिंग म्हणाला.
कार्तिकने आयपीएल 2022 च्या मोसमात 183 च्या स्ट्राइक रेटने 330 धावा केल्या. त्यामुळे 37 वर्षीय खेळाडूला भारताच्या T20 विश्वचषक संघात स्थान मिळवण्यात यश आले. परंतु भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीचा फॉर्म खूपच खराब होता. आयपीएल 2022 च्या मोसमात कोहली तीनदा गोल्डन डकवर बाद झाला. या मोसमात त्याने 16 सामन्यात 341 धावा केल्या. ज्यामध्ये फक्त दोन अर्धशतकांचा समावेश आहे.
हेही वाचा - Ranji Trophy 2022 QF : क्रीडामंत्र्याच्या शतकी खेळीच्या जोरावर बंगालने गाठली उपांत्य फेरी