नवी दिल्ली: बीसीसीआयने रणजी ट्रॉफी स्पर्धेबाबत महत्वाचा निर्णय (BCCI Important decision for Ranji Trophy) घेतला आहे. याबाबत बीसीसीआयचे सचिव जय शहा शुक्रवारी म्हणाले, या हंगामात रणजी ट्रॉफी स्पर्धा दोन सत्रात होईल. ज्यामध्ये सर्व लीग स्टेजचे सामने असतील. हे पहिल्या सत्रात आयोजित केले जाईल.
जय शाह यांनी (BCCI Secretary Jay Shah) अधिकृत निवेदनात म्हटले की, बीसीसीआयने या हंगामात रणजी ट्रॉफी स्पर्धेचे आयोजन दोन सत्रात करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या सत्रात , सर्व साखळी फेरीतील सामने पूर्ण करण्याची योजना आहे. त्याचबरोबर या स्पर्धेतील नॉकआऊट सामने जून महिण्यात होतील. कोणत्याही प्रकारची कमी यामध्ये राहणार नाही, यासाठी मिळून काम करत आहोत. महामारीच्या कारणामुळे आरोग्याची जोखीम न पत्करता करता लाल चेडूंची स्पर्धा व्यवस्थित पार पाडायची आहे.
जय शहा पुढे म्हणाले, रणजी ट्रॉफी ही देशांतर्गत क्रिकेटमधील प्रतिष्ठीत स्पर्धा आहे. जी प्रत्येक वर्षा भारतीय क्रिकेटला उत्तम खेळाडू देण्याचा प्रयत्न करते. त्याचबरोबर हे देखील महत्वाचे आहे की, या मुख्य स्पर्धेच्या आयोजनाच्या हितासाठी आम्ही सर्व आवश्यक पावले उचलू.
-
The Ranji Trophy is the backbone of Indian cricket. The moment you start ignoring it our cricket will be SPINELESS!
— Ravi Shastri (@RaviShastriOfc) January 28, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">The Ranji Trophy is the backbone of Indian cricket. The moment you start ignoring it our cricket will be SPINELESS!
— Ravi Shastri (@RaviShastriOfc) January 28, 2022The Ranji Trophy is the backbone of Indian cricket. The moment you start ignoring it our cricket will be SPINELESS!
— Ravi Shastri (@RaviShastriOfc) January 28, 2022
भारतीय संघाचे माजी कोच रवी शास्त्री (Former coach Ravi Shastri) शुक्रवारी ट्विट करत म्हणाले, रणजी करंडक हा भारतीय क्रिकेटचा कणा (Ranji Trophy backbone of Indian cricket)आहे आणि प्रमुख देशांतर्गत रेड-बॉल टूर्नामेंटकडे दुर्लक्ष करता कामा नये. ज्या क्षणी तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करायला लागाल, तेव्हा आपले क्रिकेट मणका हीन होईल. 4 जानेवारी रोजी, बीसीसीआयने देशातील वाढत्या कोरोना प्रकरणांमुळे रणजी ट्रॉफी पुढे ढकलली होती. या अगोदर रणजी ट्रॉफी आणि कर्नल सीके नायडू ट्रॉफी या वर्षी जानेवारीमध्ये सुरू होणार होती.