मुंबई: रविवारी इंडियन प्रीमियर लीगच्या ( IPL 2022 0 पंधराव्या हंगामातील 37 वा सामना खेळला गेला. हा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपरजायंट्स ( Mumbai Indians vs Lucknow Super Giants ) संघात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला पार पडला. या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स (LSG) ने मुंबई इंडियन्सवर 36 धावांनी दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात लखनौचा कर्णधार केएल राहुलने ( Captain KL Rahul ) नाबाद 103 धावा करत मोसमातील दुसरे शतक झळकावले. मात्र, विजय मिळवून शतक झळकावल्यानंतरही राहुलसाठी वाईट बातमी समोर आली आहे.
-
That's that from Match 37 and @LucknowIPL take this home with a 36-run win over #MumbaiIndians
— IndianPremierLeague (@IPL) April 24, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Scorecard - https://t.co/O75DgQTVj0 #LSGvMI #TATAIPL pic.twitter.com/9aLniT8oHi
">That's that from Match 37 and @LucknowIPL take this home with a 36-run win over #MumbaiIndians
— IndianPremierLeague (@IPL) April 24, 2022
Scorecard - https://t.co/O75DgQTVj0 #LSGvMI #TATAIPL pic.twitter.com/9aLniT8oHiThat's that from Match 37 and @LucknowIPL take this home with a 36-run win over #MumbaiIndians
— IndianPremierLeague (@IPL) April 24, 2022
Scorecard - https://t.co/O75DgQTVj0 #LSGvMI #TATAIPL pic.twitter.com/9aLniT8oHi
खरेतर, या मोसमात दुसऱ्यांदा स्लो ओव्हर रेटच्या ( Slow over rate ) गुन्ह्यात राहुल दोषी आढळला असून त्याला 24 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. राहुलशिवाय संघातील इतर खेळाडूंना 6 लाख रुपये किंवा मॅच फीच्या 50 टक्के यापैकी जे कमी असेल तो दंड ठोठावण्यात आला आहे. राहुलसाठी सर्वात मोठी वाईट बातमी म्हणजे चालू हंगामात तो पुन्हा एकदा या गुन्ह्यात दोषी आढळला, तर त्याला 30 लाख रुपयांचा दंड आणि एका सामन्याची बंदी घातली जाईल.
-
Leading from the front, Captain @klrahul11 is adjudged the Player of the Match for his outstanding knock of 103*#TATAIPL #LSGvMI pic.twitter.com/gmDFYXl0bb
— IndianPremierLeague (@IPL) April 24, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Leading from the front, Captain @klrahul11 is adjudged the Player of the Match for his outstanding knock of 103*#TATAIPL #LSGvMI pic.twitter.com/gmDFYXl0bb
— IndianPremierLeague (@IPL) April 24, 2022Leading from the front, Captain @klrahul11 is adjudged the Player of the Match for his outstanding knock of 103*#TATAIPL #LSGvMI pic.twitter.com/gmDFYXl0bb
— IndianPremierLeague (@IPL) April 24, 2022
केएल राहुल तिसर्यांदा कारवाई ( Third Time Action On KL Rahul ) - राहुलने या हंगामात एकूण तीन दंड भरले आहेत. मुंबईविरुद्धच खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात स्लो ओव्हर रेटच्या गुन्ह्यासाठी त्याला प्रथमच 12 लाखांचा दंड भरावा लागला होता. त्या सामन्यातही राहुलने नाबाद शतक झळकावले आणि त्याचा संघ विजयी झाला. यानंतर लखनौचा संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध हरला आणि या सामन्यात राहुल आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी दोषी आढळला. त्यामुळे राहुलला मॅच फीच्या 20 टक्के दंड भरावा लागला. आता त्याला स्लो ओव्हर रेटच्या गुन्ह्यासाठी पुन्हा 24 लाखांचा दंड भरावा लागणार आहे. सध्याच्या मोसमात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये राहुल दुसऱ्या स्थानावर आहे.
हेही वाचा - LSG vs MI : सलग आठ पराभव! मुंबई इंडियन्सवर लखनौ जायंट्सचा दणदणीत विजय