ETV Bharat / sports

BCCI Central Contract List : बीसीसीआयची सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट लिस्ट जाहीर ; हार्दिक पांड्यासह 'या' दिग्गज खेळाडूंचे झाले नुकसान

author img

By

Published : Mar 3, 2022, 12:51 PM IST

यष्टिरक्षक फलंदाज रिद्धिमान साहासह दुखापतीमुळे संघातून बाहेर असलेल्या हार्दिक पांड्याला वेतन श्रेणीत ( BCCI central contract ) फटका बसला आहे. त्याचबरोबर श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी संघात स्थान न मिळालेल्या पुजारा आणि रहाणे यांना यांना देखील वेतनश्रेणीचा फटका बसला आहे.

BCCI
BCCI

मोहाली : बीसीसीआयने बुधवारी खेळाडूंची सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट लिस्ट जाहीर ( BCCI announce central contract ) केली आहे. यामध्ये काही राष्ट्रीय खेळाडूंना फायदा, तर काही खेळाडूंना तोटा झालेला दिसत आहे. ज्यामध्ये अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा आणि माजी कसोटी उपकर्णधार अजिंक्य रहाणे यांना बीसीसीआयच्या ( Board of Control for Cricket in India ) ताज्या केंद्रीय करार यादीत खालच्या श्रेणीत हलवण्यात आले आहे, ज्याला बोर्डाच्या सर्वोच्च परिषदेने बुधवारी मंजुरी दिली आहे.

बीसीसीआयच्या चार वेतन श्रेण्या ( BCCI four salary categories ) आहेत. ज्यामध्ये ए+ मधील खेळाडूंना 7 कोटी रुपये, तर ए, बी आणि सी श्रेणीतील खेळाडूंना अनुक्रमे 5 कोटी, 3 कोटी आणि 1 कोटी रुपये मानधन म्हणून दिले जाते. त्यानुसार यंदा खराब फॉर्ममुळे पुजारा आणि रहाणे यांना आता बी ग्रेडमध्ये हलवण्यात आले आहे. जे आधी ए ग्रेडमध्ये होते. या दोन्ही खेळाडूंना श्रीलंकेविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेतूनही वगळण्यात आले आहे.

मागील महिन्यात 20 जानेवारील एक बातमी आली होती की, काही खेळाडूंना वार्षिक वेतन श्रेणीमध्ये नुकसान होऊ शकते. यामध्ये सर्वात मोठी घसरण दुखापतग्रस्त अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याच्या ( Loss of all-round Hardik Pandya ) श्रेणीमध्ये झाली आहे. जो या यादीत ए श्रेणी वरून थेट सी श्रेणीत ढकलला गेला आहे. तसेच यष्टिरक्षक फलंदाज रिद्धिमान साहाला कसोटी संघातून बाहेर केल्यानंतर त्याची सुद्धा घसरण झाली आहे. त्याला बी श्रेणीतून सी श्रेणीत ढकलण्यात आले आहे. तरी सुद्ध त्याला मानधन म्हणून एक कोटी मिळणार आहेत. तसेच खेळाडूंच्या श्रेणींवर निर्णय घेण्यासाठी बीसीसीआय कार्यालयाचे तीन अधिकारी, पाच निवडकर्ते आणि टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक उपस्थित असतात.

हेही वाचा - Ipl 2022 Updates : सीएसकेला मोठा झटका बसण्याची संभावना ; दीपक चहर सुरुवातीच्या सामन्याला मुकणार?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.