मुलतान: कर्णधार बाबर आझमच्या विक्रमी 17व्या शतकाच्या ( Babar Azam record 17th century ) जोरावर पाकिस्तानने बुधवारी कडाक्याच्या उन्हात पहिल्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (ODI) सामन्यात वेस्ट इंडिजचा पाच विकेट्सनी पराभव ( Pakistan Beat West Indies by 5 wickets ) केला. बाबरने 107 चेंडूत 103 धावा केल्या. त्याचबरोबर गेल्या पाच एकदिवसीय सामन्यांमधील त्याचे चौथे शतक आहे. ज्यामुळे पाकिस्तानने चार चेंडू बाकी असताना 5 बाद 306 धावा केल्या आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
-
WHAT A WIN 👏
— Pakistan Cricket (@TheRealPCB) June 8, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Multan witnesses Pakistan's highest successful run chase against West Indies in ODIs 🙌✨#PAKvWI | #KhelAbhiBaqiHai pic.twitter.com/MOhFbgk1RF
">WHAT A WIN 👏
— Pakistan Cricket (@TheRealPCB) June 8, 2022
Multan witnesses Pakistan's highest successful run chase against West Indies in ODIs 🙌✨#PAKvWI | #KhelAbhiBaqiHai pic.twitter.com/MOhFbgk1RFWHAT A WIN 👏
— Pakistan Cricket (@TheRealPCB) June 8, 2022
Multan witnesses Pakistan's highest successful run chase against West Indies in ODIs 🙌✨#PAKvWI | #KhelAbhiBaqiHai pic.twitter.com/MOhFbgk1RF
वेस्ट इंडिजविरुद्ध धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचा हा सर्वात मोठा विजय -
बाबरने इमाम-उल-हक (65) सोबत दुसऱ्या विकेटसाठी 103 धावांची भागीदारीही केली. डावखुरा फलंदाज खुशदिल शाह काही वेळा धावबाद होण्यापासून बचावला. त्याने अखेरीस वेगवान गोलंदाजांना चार षटकार खेचून 23 चेंडूत 41 धावा करून नाबाद राहिला. वेस्ट इंडिजविरुद्ध धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचा हा सर्वात मोठा विजय ( Pak biggest win chase against WI ) आहे. वेस्ट इंडिजचा कर्णधार निकोलस पूरनने नाणेफेक जिंकून 42 अंश सेल्सिअस तापमानात प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि यष्टिरक्षक आणि सलामीवीर शाई होपने 134 चेंडूत केलेल्या 127 धावांच्या जोरावर 8 बाद 305 धावा केल्या.
-
World No.1 Babar Azam rewrites record books as Pakistan overcome West Indies in 1st ODI
— PCB Media (@TheRealPCBMedia) June 8, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
More details: https://t.co/LhLSvdyYMF#PAKvWI | #KhelAbhiBaqiHai
">World No.1 Babar Azam rewrites record books as Pakistan overcome West Indies in 1st ODI
— PCB Media (@TheRealPCBMedia) June 8, 2022
More details: https://t.co/LhLSvdyYMF#PAKvWI | #KhelAbhiBaqiHaiWorld No.1 Babar Azam rewrites record books as Pakistan overcome West Indies in 1st ODI
— PCB Media (@TheRealPCBMedia) June 8, 2022
More details: https://t.co/LhLSvdyYMF#PAKvWI | #KhelAbhiBaqiHai
दुसऱ्या विकेटसाठी 154 धावांची भागीदारी -
शाई होपने ( Batsman Shy Hope ) आपल्या खेळी दरम्यान 15 चौकार आणि एक षटकाराची बरसात केली. त्याने शामर ब्रूक्स सोबत दुसऱ्या विकेटसाठी 154 धावांची भागीदारी केली. ज्यामध्ये ब्रूक्सने 83 चेंडूंचा सामना करताना 70 धावा केल्या. त्याच्या या खेळीत सात चौकारांचा समावेश होता. शेवटच्या षटकांमध्ये रोवमन पॉवेल (23 चेंडू32 धावा) आणि रोमारियो शेफर्ड ( 18 चेंडू 25 धावा ) यांनी उपयुक्त खेळी खेळत संघाची धावसंख्या 300 धावांच्या पुढे नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. पाकिस्तानकडून हरिस रौफ हा सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरला, त्याने 77 धावांत चार बळी घेतले. शाहीन शाह आफ्रिदीने 55 धावांत 2 बळी घेतले. मोहम्मद नवाज आणि शादाब खानच्या खात्यात प्रत्येकी एक विकेट आली.
हेही वाचा - Goalkeeper Savita Statement : आम्ही आमच्या चुकांवर काम केले असून बेल्जियमचा सामना करण्यास सज्ज आहोत सविता