मुंबई - गेल्यावर्षी झालेल्या इंग्लंडविरूद्धच्या कसोटी सामन्यात भारताने 2-1 अशी आघाडी मिळवली. भारताच्या या विजय़ात सलामीवीर के. एल. राहूल आणि रोहित शर्मा यांचा मोठा वाटा होता. केरेनामुळे ही अंतिम सामना होऊ शकला नाही आता तो जुलैमध्ये आयोजित करण्यात आला आहे.
रोहित शर्माने 368 रन केले 4 मॅचमध्ये.त्याशिवाय चौथ्या टेस्टच्या सेकेंड इनिंगमध्ये 127 रन्स केले औवल मैदानावर . तर दुसरीकडे 315 बॉल्समध्ये 129 रन्स पहिल्या इनिंगमध्ये लॉर्ड्सच्या मैदानावर केले आणि भारताच्या विजयाचा शिल्पकार बनला. मात्र यावेळेला कर्णधार पदा सांभाळत रोहित शर्मा इंग्लंडच्या दौऱ्यावर आला असला तरी के. एल. राहूल पायाच्या दुखापतीमुळे हजर राहू शकणार नाही आहे. त्यामुळे नवख्या शुभमन गिलच्या खांद्यावर सलामीला खेळण्याची जबाबदारी आली आहे.
2007 नंतर कसोटी सामना जिंकण्याच भारताच स्वप्न पूर्ण होणार आहे. मात्र राहूल च्या गैरहजेरीमुळे भारताच्या विजयावर परिणाम हेण्याची शक्यता असल्याच विश्लेषक संजय मांजरेकर यांनी सांगितले आहे. पण त्याचबरोबर श्रेयस अय्यर,हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा याखेळाडूंची फळी मैदानात उतरत असल्यानं विजय मिळवण अवघड नसल्याचही त्यांनी म्हटले आहे.
"ती पोकळी भरून काढण्यासाठी भारताकडे संसाधने आहेत. पण जेव्हा तुम्ही भारताच्या सीम बॉलिंगकडे बघता तेव्हा तिथे दर्जा आणि दर्जेदार पर्यायही आहेत, तसेच त्यांना दोन फिरकीपटूंशिवाय निवडण्याचे पर्याय आहेत. गेल्यावेळेप्रमाणे फलंदाजी करणे हे मोठे आव्हान असेल. "सोनी स्पोर्ट्सने आयोजित केलेल्या आभासी संवादात मांजरेकर म्हणाले आहेत.
हेही वाचा - दारुड्या पतीने झोपलेल्या मुलांना आणि बायकोला पेटवले, घटनेत पत्नीचा मृत्यू तर दोन मुले गंभीर