ढाका - बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनने श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतून माघार घेतली आहे. आयपीएल २०२१मध्ये स्वत: ला उपलब्ध करून देण्यासाठी शाकिबने हा निर्णय घेतला आहे.
एका अहवालानुसार, बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे क्रिकेट ऑपरेशनचे अध्यक्ष अकरम खान यांनी बोर्डाने शाकिबची रजा मंजूर केल्याची पुष्टी केली. शाकिब तीन एकदिवसीय सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत खेळण्याची शक्यता असेल. पण, त्यासाठी त्याला तंदुरुस्त व्हावे लागेल.
हेही वाचा - डू प्लेसिसपाठोपाठ अजून एक खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
गुरुवारी चेन्नई येथे झालेल्या आयपीएल लिलावात शाकिबला कोलकाता नाइट रायडर्सने (केकेआर) ३.२कोटी रुपयांत संघात घेतले. तो यापूर्वी २०११ ते २०१७या काळात केकेआरकडून खेळला आहे.
अक्रम म्हणाले, ''शाकिबने अलीकडेच एक पत्र लिहिले होते, ज्यात त्याने आयपीएलमध्ये खेळण्यासाठी श्रीलंका दौर्यावरुन माघार घेण्यासंबधी सांगितले होते. आम्ही त्याला तसे करण्यास परवानगी देत आहोत कारण जर एखाद्या खेळाडूला राष्ट्रीय संघासाठी कसोटी खेळायची नसेल तर, त्याच्यावर दबाव आणण्यात काही अर्थ नाही."