बंगळुरू(कर्नाटक) - आयपीएलच्या 16 व्या हंगामातील 32 वा सामना 23 एप्रिलला बंगळुरुच्या घरच्या मैदानावर खेळवण्यात आला. एम. चिन्नास्वामी स्टेडिअमवर हा सामना झाला. यात आरसीबीने राजस्थानवर 7 धावांनी विजय मिळवला आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये सामना पलटण्याची शक्यता होती. मात्र, आरसीबीच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत राजस्थानला 182 धावांवरच थोपवले. त्यामुळे सामन्यात आरसीबीने विजय मिळवला आहे. फाफ डु प्लेसिसच्या नेतृत्त्वात आरसीबी संघ पॉईंट्स टेबलमध्ये सहाव्या क्रमांकावर आहे तर, संजू सॅमसनच्या नेतृत्त्वात राजस्थान रॉयल्स पहिल्या क्रमांकावर कायम आहे.
पहिल्याच बॉलवर विराटची विकेट - आजच्या राजस्थानविरुद्धच्या सामन्यात आरसीबीने सुरुवातीला फलंदाजी केली होती. यात पहिल्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर विराट कोहलीची विकेट पडली. त्यानंतर संघाने सामन्यात कमबॅक केला. मात्र, थोड्या ओव्हरच्या अंतराने आरसीबीच्या विकेट पडत गेल्या, तरीही आरसीबीने 20 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावत 190 धावांचे टार्गेट राजस्थानसमोर ठेवले होते. या टार्गेटचा पाठलाग करताना राजस्थाननेसुद्धा चांगली सुरुवात केली होती. मात्र, सातत्याने विकेट्स पडत होत्या. अखेरच्या औव्हरमध्ये आरसीबीच्या गोलंदाजांनी राजस्थानवला 182 धावांवरच रोखले. त्यामुळे आरसीबीने हा विजय मिळवला आहे.
मागील सामन्यात विजय, पराभव - राजस्थान रॉयल्स संघाला मागील सामन्यात लखनौकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. तसेच मागील सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने पंजाब किंग्सवर विजय मिळवला होता. त्यामुळे हे दोन्ही संघ सध्या पॉईंट टेबलमध्ये बलाढ्य आहेत.
पॉईंट टेबलवर एक नजर - आयपीएलच्या सुरू असलेल्या सीजनमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने 28 पैकी 13 सामने जिंकले आहेत, तर राजस्थान रॉयल्स संघाने 12 सामने जिंकले आहेत. त्यामुळे आयपीएल 16 सिजनच्या पॉईंट टेबलमध्ये हे दोन्ही संघ टॉपवर असल्याचे दिसून येत आहे.
राजस्थान रॉयल्स प्लेइंग इलेव्हन - संजू सॅमसन (कर्णधार), जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, जेसन होल्डर, ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची प्लेइंग इलेव्हन - विराट कोहली (कर्णधार), फाफ डुप्लेसिस, महिपाल लोमरर, ग्लेन मॅक्सवेल, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), सुयश प्रभुदेसाई, डेव्हिड विली, वनिंदू हसरंगा, मोहम्मद सिराज, विजयकुमार.
हेही वाचा - Betting On IPL Cricket Matches: आयपीएल क्रिकेट मॅचवर सट्टा खेळणाऱ्या दोघांना दीड लाखांच्या मुद्देमालासह अटक