मुंबई: इंडियन प्रीमियर लीग ( IPL 2022 ) चा 15 वा हंगाम सुरू आहे. ज्यामध्ये चेन्नई सुपर किंग्ज ( Chennai Super Kings ) आणि पंजाब किंग्ज ( Punjab Kings ) यांच्यात हंगामातील 38 व्या सामना खेळला गेला. या सामन्यात पंजाबने चेन्नईवर 11 धावांनी विजय मिळवला. दरम्यान या सामन्यात एका वेगळ्या गोष्टीची चर्चा पाहायला मिळाली. हिमाचल प्रदेशातून येणारा वेगवान गोलंदाज अष्टपैलू ऋषी धवन ( All-rounder Rishi Dhavan ) फेस प्रोटेक्शन मास्क ( Face Protection mask ) परिधान करून आला होता. अशा स्थितीत त्याला पाहताच सर्व चाहत्यांच्या मनात प्रश्न निर्माण होऊ लागला की, ते चष्म्यासारखे आणि थोडेसे कोरोना शील्डसारखे दिसणारे नक्की काय आहे. अखेर असे काय आहे की आयपीएलमध्ये 6 वर्षांनंतर मैदानात उतरलेला ऋषी धवन तो परिधान करून मैदानात उतरला आहे.
या दोन कारणांमुळे ऋषींनी प्रोटेक्शन मास्क घातला - वास्तविक, ऋषी धवनने चेहऱ्यावर फेस प्रोटेक्शन ( Face Protection ) मास्क घातला होता. कारण भारताच्या देशांतर्गत क्रिकेटच्या रणजी ट्रॉफीच्या सामन्यादरम्यान त्याच्या चेहऱ्यावर खूप वेगाने चेंडू लागला होता. त्यामुळे ऋषीला नाकाला दुखापत झाली होती. अशाप्रकारे, भविष्यात अशाच प्रकारच्या दुखापती टाळण्यासाठी हे संरक्षण मास्क घातले होते. त्यामुळे फलंदाजांना चेंडू पाहण्यात कोणतीही अडचण येत नाही आणि ते नियमांच्या विरोधात नाही.
-
Rishi Dhawan playing his first IPL match in 6 years. pic.twitter.com/TSpWe4lv2r
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 25, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Rishi Dhawan playing his first IPL match in 6 years. pic.twitter.com/TSpWe4lv2r
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 25, 2022Rishi Dhawan playing his first IPL match in 6 years. pic.twitter.com/TSpWe4lv2r
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 25, 2022
आणखी एक कारण असेही समोर आले आहे की, जेव्हा तो गोलंदाजी करतो तेव्हा चेंडू फेकल्यानंतर तो फलंदाजाच्या दिशेने धावतो. त्यामुळे दुखापतीचा धोका वाढतो. या दोन कारणांमुळे जेव्हा ऋषी चेन्नईविरुद्धच्या आयपीएल मैदानात 6 वर्षांनी उतरतो तेव्हा त्याने चष्मासारखा संरक्षक मुखवटा घातला होता. 21 मे 2016 रोजी धवनने आयपीएलमध्ये शेवटचा सामना खेळला होता.
-
Rayudu batting even more aggressively tonight. Rishi Dhawan's glasses may have reminded him of something 😜 #PBKSvCSK #IPL2022 pic.twitter.com/J9teFyaDO2
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) April 25, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Rayudu batting even more aggressively tonight. Rishi Dhawan's glasses may have reminded him of something 😜 #PBKSvCSK #IPL2022 pic.twitter.com/J9teFyaDO2
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) April 25, 2022Rayudu batting even more aggressively tonight. Rishi Dhawan's glasses may have reminded him of something 😜 #PBKSvCSK #IPL2022 pic.twitter.com/J9teFyaDO2
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) April 25, 2022
55 लाखांमध्ये पंजाबमध्ये सामील - त्याचवेळी फेब्रुवारीमध्ये झालेल्या आयपीएल मेगा लिलावात धवनला पंजाब किंग्जने 55 लाख रुपयांना खरेदी केले होते. तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये हिमाचल प्रदेशचे प्रतिनिधित्व करतो. गेल्या देशांतर्गत हंगामात धवनने चेंडू आणि बॅट या दोन्ही बाजूंनी धमाका केला होता. त्यामुळेच पंजाबने त्याचा संघात समावेश केला. धवनने 8 सामन्यात 458 धावा करण्यासोबतच 17 विकेट्स घेतल्या आहेत. ज्यासह हिमाचलने ट्रॉफी जिंकली. याआधी 2018-19 हंगामात धवनने रणजी ट्रॉफीमध्येही 519 धावा केल्या होत्या.
पंजाबने 188 धावांचे लक्ष्य ठेवले होते - सामन्याच्या अखेरीस शिखर धवनच्या नाबाद 88 आणि भानुका राजपक्षे (42) सोबत दुसऱ्या विकेटसाठी केलेल्या 110 धावांच्या भागीदारीच्या जोरावर पंजाब किंग्जने इंडियन प्रीमियर लीगच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध चार गडी राखून आव्हानात्मक खेळी केली. धवनने 59 चेंडूंत नाबाद खेळीत दोन षटकार आणि नऊ चौकार लगावले. लियाम लिव्हिंगस्टोनने धवनला चांगली साथ देत सात चेंडूत 19 धावांची शानदार खेळी केली. त्यामुळे पंजाबने 4 बाद 187 धावसंख्या उभारली.
चेन्नई संघाला 188 धावांचे लक्ष्य मिळाले होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना अंबाती रायडूने सर्वाधिक 78 धावांची खेळी. त्याचबरोबर ऋतुराज गायकवाडने 30 धावांची खेळी केली. तसेच माजी कर्णधार धोनीने 12 धावा केल्या. कर्णधार रवींद्र जडेजा 21 धावा केल्या. तरी सुद्धा चेन्नईचा संघ निर्धारित 20 षटकात 6 बाद 176 धावाच करू शकला. त्यामुळे त्यांचा 11 धावांनी पराभव झाला.
हेही वाचा - CSK vs PBKS : चेन्नई सुपर किंग्जचा पंजाब किंग्जकडून 11 धावांनी पराभव