ETV Bharat / sports

IPL 2022 Updates : स्मिथ आणि शास्त्रीच्या मते 'असा' होणार राजस्थान-बंगळुरुचा क्वालिफायर सामना - टाटा आयपीएल 2022

आयपीएल 2022 ( IPL 2022 ) चा दुसरा क्वालिफायर सामना राजस्थान विरुद्ध बंगळुरु संघात खेळला जाणार आहे. या सामन्यातील विजेता 29 मे रोजी गुजरात संघासोबत फायनलमध्ये सामना करेल. त्या अगोदर राजस्थान विरुद्ध बंगळुरु संघातील सामन्यावर माजी दिग्गज खेळाडू रवी शास्त्री आणि ग्रॅमी स्मिथ यांनी आपली मते मांडली आहेत.

Shastri & Graeme
Shastri & Graeme
author img

By

Published : May 26, 2022, 8:18 PM IST

अहमदाबाद: इंडियन प्रीमियर लीगचा पंधरावा हंगाम आता रोमांचक टप्प्यात आला आहे. यंदाच्या हंगामातील फक्त तीन दोन सामने बाकी आहे. त्यानंतर आयपीएल 2022 च्या विजेत्याचे नाव जाहीर होईल. या अगोदर क्वालिफायरचा दुसरा आणि फायनल सामना खेळला जाणार आहे. दुसरा क्वालिफायर सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु ( Qualifier 2 RCB vs RR ) संघात खेळला जाणार आहे. या सामन्या अगोदर माजी खेळाडू रवी शास्त्री आणि ग्रॅमी स्मिथ आपली मते मांडली आहेत.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि राजस्थान रॉयल्स ( RCB vs RR ) यांच्यात शुक्रवारी नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएल 2022 च्या क्वालिफायर 2 मध्ये काट्याची टक्कर पाहायला मिळू शकेल, असा विश्वास भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केला आहे. कारण दोन्ही संघांना रविवारी गुजरात टायटन्सशी सामना करुन विजेतेपद पटकावयचे आहे. परंतु दोन्ही संघांपैकी फक्त एका संघाला गुजरातबरोबर मुकाबला करण्याची संधी मिळेल.

स्टार स्पोर्ट्सवरील क्रिकेट लाइव्ह शोमध्ये शास्त्री ( Former player Ravi Shastri ) म्हणाले, आरसीबीला 14 वर्षे झाली आहेत. त्यांनी आयपीएलचा एक ही किताब पटकावला नाही, तसे 13 वर्षांपूर्वी राजस्थानने त्यांचे शेवटचे विजेतेपद जिंकले होते. त्यामुळे दोघांमध्ये काट्याची स्पर्धा पाहायला मिळणार आहे. त्यासाठी वाट पाहू. ही स्पर्धा खूप मोठी होणार आहे कारण दोन्ही संघांना ती शानदार ट्रॉफी जिंकायची आहे.

दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथ ( Former player Grammy Smith ) याच्या मते क्वालिफायर 2 ही मोठी स्पर्धा असणार आहे. गुजरातविरुद्धच्या क्वालिफायर 1 मध्ये सात विकेटने पराभव झाल्यानंतर संजू सॅमसनच्या संघावर दबाव असेल, असे स्मिथला वाटते. बंगळुरूने एलिमिनेटरमध्ये लखनौ सुपर जायंट्सचा 14 धावांनी पराभव करत सामन्यात प्रवेश केला.

आयपीएल 2022 मध्ये, बंगळुरू आणि राजस्थान या दोन्ही संघांनी स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे, जिथे ते विजेतेपदाचा दुष्काळ संपवू शकतात. बंगळुरूला अद्याप पहिली आयपीएल ट्रॉफी जिंकता आलेली नाही. 2008 मध्ये आयपीएलचा पहिला सीझन जिंकल्यापासून राजस्थान देखील त्या ट्रॉफीपासून वंचित आहे. यंदाच्या हंगामात राजस्थान आणि बंगळुरु संघात दोन सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी प्रत्येकी एक सामना दोन्ही संघांनी जिंकला आहे.

हेही वाचा - IOA President : आयओएच्या अध्यक्षपदावरून हटवण्यात आल्याचे वृत्त बत्रा यांनी फेटाळले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.