पुणेः इंडियन प्रीमियर लीगच्या पंधराव्या हंगामातील 42 वा सामना पुणे येथील एमसीए क्रिकेट मैदानावर खेळला जाणार आहे. हा सामना शुक्रवारी (29एप्रिल) पंजाब किंग्ज विरुद्ध लखनौ सुपरजायंट्स ( Punjab Kings vs Lucknow Super Giants ) संघात होणार आहे. या सामन्याला संध्याकाळी साडेसातला सुरुवात होणार आहे. या सामन्यात पंजाब संघाची धुरा मयंक अग्रवालच्या ( Mayank Agarwal ) आणि लखनौ संघाची धुरा केएल राहुलच्या ( KL Rahul ) खांद्यावर आहे.
आयपीएलच्या पंधराव्या हंगामात आतापर्यंत दोन्ही संघांनी प्रत्येकी आठ सामने खेळले आहेत. या आठ सामन्यांपैकी लखनौ सुपरजायंट्सने ( Lucknow Super Giants Team ) पाच सामने जिंकले आहेत, तर तीन सामन्यात त्यांना हार पत्कारावी लागली आहे. त्यामुळे या संघाचे 10 गुण असून हा संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानी आहे. त्याचबरोबर पंजाब किंग्ज संघाने आपल्या आठ सामन्यांपैकी चार सामने जिंकलेत आणि चार गमवाले आहेत. त्यामुळे या संघाचे 8 गुण असून हा संघ गुणतालिकेत सातव्या स्थानी आहे.
-
𝙍𝙚𝙖𝙙𝙮 𝙛𝙤𝙧 𝙩𝙝𝙚 𝙂𝙞𝙖𝙣𝙩 𝙨𝙝𝙤𝙬𝙙𝙤𝙬𝙣❓#SherSquad, keep the 🍿 ready for another thriller tonight 😉 #SaddaPunjab #PunjabKings #IPL2022 #ਸਾਡਾਪੰਜਾਬ #PBKSvLSG @jiteshsharma_ @LucknowIPL @QuinnyDeKock69 pic.twitter.com/FmM7Av4W4N
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) April 29, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">𝙍𝙚𝙖𝙙𝙮 𝙛𝙤𝙧 𝙩𝙝𝙚 𝙂𝙞𝙖𝙣𝙩 𝙨𝙝𝙤𝙬𝙙𝙤𝙬𝙣❓#SherSquad, keep the 🍿 ready for another thriller tonight 😉 #SaddaPunjab #PunjabKings #IPL2022 #ਸਾਡਾਪੰਜਾਬ #PBKSvLSG @jiteshsharma_ @LucknowIPL @QuinnyDeKock69 pic.twitter.com/FmM7Av4W4N
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) April 29, 2022𝙍𝙚𝙖𝙙𝙮 𝙛𝙤𝙧 𝙩𝙝𝙚 𝙂𝙞𝙖𝙣𝙩 𝙨𝙝𝙤𝙬𝙙𝙤𝙬𝙣❓#SherSquad, keep the 🍿 ready for another thriller tonight 😉 #SaddaPunjab #PunjabKings #IPL2022 #ਸਾਡਾਪੰਜਾਬ #PBKSvLSG @jiteshsharma_ @LucknowIPL @QuinnyDeKock69 pic.twitter.com/FmM7Av4W4N
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) April 29, 2022
पंजाब किंग्ज संघासाठी ( Punjab Kings Team ) कर्णधार मयांक अग्रवालचा फॉर्म चिंतेचा विषय आहे. चालू हंगामातील त्याची कामगिरी चढ-उतारांनी भरलेली आहे आणि त्याने आतापर्यंत सात सामन्यांत केवळ एकच अर्धशतक केले आहे. त्याच्या कामगिरीत सातत्य असले पाहिजे आणि धवनसह संघाला चांगली सुरुवात करावी लागेल. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या भानुका राजपक्षेने छाप पाडली आहे. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या शेवटच्या सामन्यात त्याने 32 चेंडूत 42 धावा केल्या आणि श्रीलंकेच्या फलंदाजाला आपली चांगली कामगिरी कायम ठेवायला आवडेल.
-
Eyes on the ball, feet on the ground, just like a #SuperGiant 💪🏽#AbApniBaariHai💪#IPL2022 🏆 #bhaukaalmachadenge #lsg #LucknowSuperGiants #T20 #TataIPL pic.twitter.com/1AMRokWAm2
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) April 29, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Eyes on the ball, feet on the ground, just like a #SuperGiant 💪🏽#AbApniBaariHai💪#IPL2022 🏆 #bhaukaalmachadenge #lsg #LucknowSuperGiants #T20 #TataIPL pic.twitter.com/1AMRokWAm2
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) April 29, 2022Eyes on the ball, feet on the ground, just like a #SuperGiant 💪🏽#AbApniBaariHai💪#IPL2022 🏆 #bhaukaalmachadenge #lsg #LucknowSuperGiants #T20 #TataIPL pic.twitter.com/1AMRokWAm2
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) April 29, 2022
लखनौ सुपरजायंट्स संघासाठी क्विंटन डी कॉकने ( Quinton de Kock ) आतापर्यंत 225 धावा केल्या आहेत, मात्र तो त्याच्या क्षमतेला पूर्णपणे न्याय देऊ शकला नाही. लखनौची फलंदाजी अधिक चांगली कामगिरी करण्यासाठी मजबूत करावी लागेल. अनुभवी मनीष पांडे, आक्रमक फलंदाज मार्कस स्टॉइनिस आणि क्रुणाल पांड्या, भरवशाचा दीपक हुडा आणि युवा आयुष बडोनी शिवाय वेस्ट इंडिजचा अष्टपैलू जेसन होल्डर यांच्या उपस्थितीत लखनौच्या फलंदाजीची फळी सखोल आहे. संघाच्या गोलंदाजांनीही चांगली कामगिरी केली आहे. श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज दुष्मंता चमिरा आणि होल्डरने प्रभावित केले आहे. या दोघांनी मिळून आतापर्यंत 14 बळी घेतले असून त्यांना पंजाबविरुद्धही ही कामगिरी कायम ठेवावी लागणार आहे. क्रुणाल आणि रवी बिष्णई या फिरकीपटूंची आठ षटके महत्त्वपूर्ण ठरू शकतात आणि सामन्याचा मार्ग बदलू शकतात. त्यामुळे आजचा सामना रोमांचक होण्याची अपेक्षा आहे.
पंजाब किंग्ज : मयंक अग्रवाल (कर्णधार), शिखर धवन, अर्शदीप सिंग, कागिसो रबाडा, जॉनी बेअरस्टो, राहुल चहर, हरप्रीत ब्रार, शाहरुख खान, प्रभसिमरन सिंग, जितेश शर्मा, इशान पोरेल, लियाम लिव्हिंगस्टोन, ओडियन स्मिथ, संदीप शर्मा, राज अंगद बावा, ऋषी धवन, प्रेरक मंकड, वैभव अरोरा, हृतिक चॅटर्जी, बलतेज धांडा, अंश पटेल, नॅथन एलिस, अथर्व तायडे, भानुका राजपक्षे आणि बेनी हॉवेल.
लखनऊ सुपर जायंट्स : लोकेश राहुल (कर्णधार), मनन वोहरा, एविन लुईस, मनीष पांडे, क्विंटन डी कॉक, रवी बिश्नोई, दुष्मंता चमिरा, शाहबाज नदीम, मोहसीन खान, मयंक यादव, अंकित राजपूत, आवेश खान, अँड्र्यू टाय, मार्कस स्टॉइनिस, काइल मेयर्स, करण शर्मा, कृष्णप्पा गौतम, आयुष बडोनी, दीपक हुडा, कृणाल पंड्या आणि जेसन होल्डर.
हेही वाचा - DC vs KKR : दिल्ली कॅपिटल्सचा अटीतटीच्या लढतीत कोलकाता नाईट रायडर्सवर विजय