मुंबई: सोमवारी (8 मे) आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 56 वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स ( Mumbai Indians vs Kolkata Knight Riders ) संघात पार पडला. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने मुंबई इंडियन्सचा मोठ्या फरकाने पराभव करून प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा जिवंत ठेवल्या. केकेआरने मुंबई इंडियन्सचा 52 धावांनी पराभव केला आणि गुणतालिकेत सातव्या स्थानी झेप घेतली. त्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरने मोठा खुलासा केला आहे.
नवी मुंबईतील डी. व्हाय पाटील स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे केकेआरने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 165/9 धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सचा संघ 17.3 षटकांत 113 धावा करून सर्वबाद झाला.
-
That's that from Match 56.@KKRiders take this home comfortably with a 52-run win over #MumbaiIndians
— IndianPremierLeague (@IPL) May 9, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Scorecard - https://t.co/eXsU8yDmge #MIvKKR #TATAIPL pic.twitter.com/3gu0ZsHYH6
">That's that from Match 56.@KKRiders take this home comfortably with a 52-run win over #MumbaiIndians
— IndianPremierLeague (@IPL) May 9, 2022
Scorecard - https://t.co/eXsU8yDmge #MIvKKR #TATAIPL pic.twitter.com/3gu0ZsHYH6That's that from Match 56.@KKRiders take this home comfortably with a 52-run win over #MumbaiIndians
— IndianPremierLeague (@IPL) May 9, 2022
Scorecard - https://t.co/eXsU8yDmge #MIvKKR #TATAIPL pic.twitter.com/3gu0ZsHYH6
सामन्यानंतर केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यरने ( KKR captain Shreyas Iyer ) या विजयावर आनंद व्यक्त करत संघाची कामगिरी इतर सामन्यांमध्येही अशीच सुरू ठेवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तो म्हणाला, दमदार पुनरागमन करून सामना मोठ्या फरकाने जिंकला. पॉवरप्लेमध्ये आमची सुरुवात चांगली झाली आणि व्यंकटेश अय्यरने गोलंदाजांना चांगला चोप दिला. नितीश राणाने पोलार्डच्या चेंडूंवर ज्या पद्धतीने षटकार मारले, ते बघण्यासारखे होते. पण नवीन फलंदाजाला खेळपट्टीवर येताच धावा काढणे अवघड आहे असे मला वाटले.
सामना संपल्यानंतर श्रेयस अय्यरने संघ निवडीत सीईओचाही ( CEO in KKR team selection Include CEO ) सहभाग असल्याचा धक्कादायक खुलासा केला. मुंबईविरुद्धच्या सामन्यात केकेआरने त्यांच्या प्लेइंग 11 मध्ये 5 बदल केले. अय्यरने कबूल केले की जे खेळाडू खेळत नव्हते त्यांना सांगणे खूप कठीण होते.
-
Pat Cummins is our Top Performer from the second innings for his bowling figures of 3/22.
— IndianPremierLeague (@IPL) May 9, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
A look at his bowling summary here 👇👇 #TATAIPL #MIvKKR pic.twitter.com/6cVTYN4KyF
">Pat Cummins is our Top Performer from the second innings for his bowling figures of 3/22.
— IndianPremierLeague (@IPL) May 9, 2022
A look at his bowling summary here 👇👇 #TATAIPL #MIvKKR pic.twitter.com/6cVTYN4KyFPat Cummins is our Top Performer from the second innings for his bowling figures of 3/22.
— IndianPremierLeague (@IPL) May 9, 2022
A look at his bowling summary here 👇👇 #TATAIPL #MIvKKR pic.twitter.com/6cVTYN4KyF
अय्यर म्हणाला, 'हे खूप अवघड होते. जेव्हा मी आयपीएल खेळायला सुरुवात केली, तेव्हा मी एकदा अशा स्थितीत होतो. आम्ही प्रशिक्षकाशी बोललो. टीम सिलेक्शनमध्ये सीईओचाही सहभाग ( CEO's involvement in team selection ) होता. तो पुढे म्हणाला, 'ब्रेंडन मॅक्क्युलमने खेळाडूंशी बोलून तुम्ही खेळत नसल्याचे सांगितले. या निर्णयाचा सर्वांनी आदर केला. ज्या पद्धतीने सर्वजण मैदानावर आले, प्लेइंग 11 च्या सर्व खेळाडूंनी ज्या प्रकारे आपली ताकद दाखवली, एक कर्णधार म्हणून तुम्हाला अभिमान वाटतो. मला आमच्या विजयाचा अभिमान आहे. हा एकतर्फी विजय होता.
हेही वाचा - IPL 2022 Updates : मुंबई इंडियन्स संघाला मोठा धक्का; दुखापतीमुळे स्टार फलंदाज आयपीएल स्पर्धेतून बाहेर