पुणे: इंडियन प्रीमियर लीगच्या ( Indian Premier League ) पंधराव्या हंगामातील 29 सामना रविवारी पार पडणार आहे. हा सामना पुणे येथील एमसीए क्रिकेट मैदानावर खेळवला जाणार आहे. या सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज ( Gujarat Titans vs Chennai Super Kings ) यांच्यात लढत होणार आहे. या सामन्यासाठी चेन्नई संघ कर्णधार रवींद्र जडेजाच्या ( Ravindra Jadeja ) नेतृत्वाखाली उतरेल, तर गुजरात टायटन्सचा संघ हार्दिक पांड्याच्या ( Hardik Pandya ) नेतृत्वाखाली खेळताना दिसेल.
-
Cricket na jalsa ma tamaru swagat chhe 🔥🙏#SeasonOfFirsts #AavaDe #GTvCSK pic.twitter.com/fqWdjNxMsK
— Gujarat Titans (@gujarat_titans) April 17, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Cricket na jalsa ma tamaru swagat chhe 🔥🙏#SeasonOfFirsts #AavaDe #GTvCSK pic.twitter.com/fqWdjNxMsK
— Gujarat Titans (@gujarat_titans) April 17, 2022Cricket na jalsa ma tamaru swagat chhe 🔥🙏#SeasonOfFirsts #AavaDe #GTvCSK pic.twitter.com/fqWdjNxMsK
— Gujarat Titans (@gujarat_titans) April 17, 2022
गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात हा सामना पहिल्यांदाच खेळला जात आहे. कारण गुजरात टायटन्स संघाने यंदाच आयपीएल स्पर्धेत पदार्पण केले आहे. दोन्ही संघाच्या यंदाच्या हंगामातील आतापर्यंत कामगिरी पाहिली, तर दोन्ही संघात खुप फरक आहे. दोन्ही संघानी देखील यंदाच्या हंगामातील प्रत्येकी पाच सामने खेळले आहेत. चेन्नई सुपर किंग्ज संघाने आपल्या पाच सामन्यापैकी फक्त एका सामन्यात विजय मिळवला आहे. त्याचबरोबर चार सामन्यात पराभव स्वीकारला आहे. त्यामुळे हा संघ गुणतालिकेत दोन गुणांसह 9 व्या स्थानी विराजमान आहे. गुजरात टायटन्सबद्दल ( Gujarat Titans ) बोलायचे, तर या संघाने आतपर्यंत पाचपैकी फक्त एक सामना गमावला आहे. त्याचबरोबर चार सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे हा संघ गुणतालिकेत आठ गुणांसह अव्वल स्थानी विराजमान आहे.
-
Out ☑️ or Not ✖️? What’s your ‘what if’ take? 👀#Yellove #WhistlePodu 🦁💛 @imjadeja @DJBravo47 pic.twitter.com/iR0nJWdmwW
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) April 17, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Out ☑️ or Not ✖️? What’s your ‘what if’ take? 👀#Yellove #WhistlePodu 🦁💛 @imjadeja @DJBravo47 pic.twitter.com/iR0nJWdmwW
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) April 17, 2022Out ☑️ or Not ✖️? What’s your ‘what if’ take? 👀#Yellove #WhistlePodu 🦁💛 @imjadeja @DJBravo47 pic.twitter.com/iR0nJWdmwW
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) April 17, 2022
चार पराभवानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला (आरसीबी) पराभूत करत चेन्नई सुपर किंग्जने ( Chennai Super Kings ) पहिला विजय नोंदवला होता. ही कामगिरी पुढे चालू ठेवण्याची रविवारी येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर गुजरात टायटन्सविरुद्ध आशा करेल. या ठिकाणी सीएसकेचा हा पहिलाच सामना असेल आणि शिवम दुबे आणि रॉबिन उथप्पा सारखे खेळाडू पुन्हा एकदा स्फोटक खेळी कशी खेळू शकतात हे पाहणे बाकी आहे. दुबेच्या नाबाद 95 आणि उथप्पाच्या 88 धावांमुळे सीएसकेने 216/4 अशी मोठी धावसंख्या उभारली. कारण चार वेळा आयपीएल चॅम्पियनने 12 एप्रिल रोजी 23 धावांनी हंगामातील पहिला विजय नोंदवला होता. तसेच गुजरात टायटन्स आपले अव्वल स्थान मजबूत करण्यासाठी हा सामना जिंकण्यच्या इराद्याने मैदानात उतरतील.
एमसीएच्या खेळपट्टीवर प्रथम आणि द्वितीय फलंदाजी करणार्या संघांमध्ये जवळपास बरोबरीचा सामना पाहायला मिळाला आहे. प्रथम फलंदाजी करणार्या संघाने तीन सामने जिंकले आहेत, तर पाठलाग करणार्या संघाला दोन वेळा यश मिळाले आहे आणि आतापर्यंतच्या स्पर्धेत एमसीए स्टेडियमवर पहिल्या डावात सरासरी 178 धावा केल्या आहेत, ज्यामुळे हा आणखी एक उच्च-स्कोअर सामना बघायला मिळण्याची शक्यता आहे.