मुंबई - राजस्थान रॉयल्सचा खेळाडू लियाम लिविंगस्टोन याने बायो बबलचा थकवा जाणवत असल्याचे कारण देत आयपीएल २०२१ स्पर्धेतून माघार घेतली होती. आता लियामच्या जागेवर बदली खेळाडू म्हणून राजस्थान रॉयल्स संघाने नवीन परदेशी खेळाडूला संधी दिली आहे. त्याचे नाव गेराल्ड कोएट्जी असे आहे.
राजस्थान रॉयल्स संघात लियाम लिविंगस्टोनच्या जागी दक्षिण आफ्रिकन संघाचा गोलंदाज गेराल्ड कोएट्जी याला संधी देण्यात आली आहे. २० वर्षीय गेराल्ड कोएट्जीने १९ वर्षाखालील क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. १९ वर्षाखालील विश्वचषकात त्याने भारतीय संघाविरुद्ध खेळताना ३ गडी बाद केले होते.
गेराल्ड कोएट्जी याने आतापर्यंत एकूण ६ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. यात त्याने १६२ धावा आणि २४ गडी बाद केले आहेत. यासोबतच त्याने आतापर्यंत एकूण ६ लिस्ट ए सामने खेळले आहेत. यात त्याने १० गडी देखील बाद केले आहेत. तसेच टी -२० क्रिकेटबद्दल बोलायचं झालं, तर त्याने ८ टी-२० सामन्यात ९ गडी बाद केले आहेत.
दरम्यान, राजस्थान रॉयल्सचे महत्वाचे खेळाडू जोफ्रा आर्चर आणि बेन स्टोक्स हे दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर पडले. त्यानंतर लियान लिविंगस्टन आणि अँड्र्यू टाय यांनी देखील आयपीएलमधून अर्ध्यातून माघार घेतली.
हेही वाचा - IPL २०२१ : CSK विरुद्धच्या सामन्यात MI ने चिटिंग केली; हे मुंबईचे स्पिरीट का?
हेही वाचा - RR VS SRH : हैदराबादचा नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय