मोहाली - आय.एस. बिद्रा स्टेडियमवर झालेल्या सामन्यात पंजाबने राजस्थानवर १२ धावांनी विजय मिळविला. लोकेश राहुल ५२ तर डेव्हिड वॉर्नरच्या ४० धावांच्या जोरावर पंजाबने राजस्थानपुढे विजयासाठी १८३ धावांचे मोठे आव्हान ठेवले आहे. राजस्थानला निर्धारित २० षटकात ७ बाद १७० धावा करता आल्या.
पंजाबने निर्धारित २० षटकात ६ बाद १८२ धावांपर्यंत मजल मारली. राजस्थानकडून जोफ्रा आर्चरने सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने भन्नाट स्पेल टाकत १५ धावात ३ बळी घेतले.
१८२ धावांचा पाठलाग करताना राजस्थानने आक्रमक सुरूवात केली. राहुल त्रिपाठी ५०, जोस बटलर २३, संजू सॅमसन २७, अजिंक्य रहाणे २६ आणि स्टुअर्ट बिनीने ३३ धावांचे योगदान दिले. पंजाबकडून तर आर. अश्विन आणि अर्शदिप सिंग यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. एम. अश्विन यास एक बळी घेण्यात यश आले.
राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंजाबच्या सलामीच्या फलंदाजांनी ३८ धावांची भर घातली. ख्रिस गेल आक्रमक खेळण्याच्या नादात ३० धावा काढून बाद झाला. त्यानंतर राहुलने आक्रमकपणा कायम ठेवत ४७ चेंडूत ५२ धावा काढून उनाडकटच्या गोलंदाजीवर माघारी परतला. डेव्हिड मिलरने त्याला चांगली साथ दिली. त्याने ४० धावाची झटपट खेळी केली.
आर. अश्विनने शेवटच्या ४ चेंडूत २ षटकार आणि १ चौकार ठोकत १७ धावा वसूल केल्या. मयंक अगरवालने २६ धावांचे योगदान दिले. धवल कुलकर्णी, जयदेव उनाडकट आणि ईश सोढी यांने प्रत्येकी १ गडी बाद केले.