ETV Bharat / sports

एका चाहत्याने भरले रोहित, पृथ्वी आणि पंतच्या जेवणाचे बिल!

author img

By

Published : Jan 2, 2021, 10:09 AM IST

रोहित शर्मा, शुबमन गिल, ऋषभ पंत आणि पृथ्वी शॉ मेलबर्नमधील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. त्यावेळी नवलदीप सिंह नावाच्या एका चाहत्याने आपल्या लाडक्या खेळांडूंना पाहिले. यावेळी त्याने एक व्हिडिओ बनवला.

indian fan pays the bill for indian cricketers in melbourne restaurant
एका चाहत्याने भरले रोहित, पृथ्वी आणि पंतच्या जेवणाचे बिल!

मेलबर्न - भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघांत बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. या मालिकेचे दोन सामने झाले असून दोन सामने शिल्लक आहेत. अ‌ॅडलेड येथे झालेल्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला नमवले. तर, मेलबर्नवरील बॉक्सिंग डे कसोटीत अजिंक्यसेना विजयी झाली. आता सिडनी येथे तिसरा सामना खेळला जाणार आहे. या कसोटीसाठी दोन्ही संघांची जय्यत तयारी सुरू आहे.

हेही वाचा - नवीन वर्ष टीम इंडियासाठी असणार 'पॉवरपॅक'..पाहा वेळापत्रक

दरम्यान, रोहित शर्मा, शुबमन गिल, ऋषभ पंत आणि पृथ्वी शॉ मेलबर्नमधील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. त्यावेळी नवलदीप सिंह नावाच्या एका चाहत्याने आपल्या लाडक्या खेळांडूंना पाहिले. यावेळी त्याने एक व्हिडिओ बनवला. इतकेच नव्हे तर नवलदीपने या खेळाडूंच्या जेवणाच्या बिलाचेही पैसे भरले. या घटनेबाबतची सर्व माहिती नवलदीपने ट्विटरवर शेअर केली आहे.

indian fan pays the bill for indian cricketers in melbourne restaurant
मेलबर्नच्या एका हॉटेलमध्ये भारतीय क्रिकेटपटू

नवलदीपने केलेली ही गोष्ट समजताच रोहित शर्मा आणि इतर क्रिकेटपटूंनी त्याला भेट दिली. ''पैसे घे रे असे चांगले वाटत नाही'', असे रोहित नवलदीपला म्हणाला. शिवाय, ''आम्ही तुझ्याबरोबर फोटो तेव्हाच काढू जेव्हा तू पैसे घेशील'', असे पंतही म्हणाला. मात्र, नवलदीपने त्यांच्याकडून पैसे घेण्यास नकार दिला. अखेर सर्वांनी त्याच्याबरोबर फोटो काढले.

जेव्हा क्रिकेटपटू नवलदीपला भेटतात...

नवलदीपने किली बिल भरले?

नवलदीप सिंग यांनी ट्विटर पोस्ट केलेल्या फोटोनुसार, रोहित शर्मा आणि क्रिकेटपटूंनी सोय सॉस चिकन, चिकन मशरूम आणि डाएट कोक अशी ऑर्डर दिली होती. त्यांचे बिल ११८.६९ डॉलर (जवळपास ६६८३ रुपये) एवढे आले होते.

भारतीय क्रिकेटपटूंच्या जेवणाचे बिल

रोहित उपकर्णधार -

ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जात असलेल्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अंतिम दोन कसोटी सामन्यांसाठी रोहित शर्माकडे उपकर्णधार पदाची कमान सोपविण्यात आली आहे. रोहितच्या अनुपस्थितीत मेलबर्न कसोटीत चेतेश्वर पुजाराकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.