मेलबर्न: सध्या भारतात इंडियन प्रीमियर लीगच्या पंधराव्या हंगामाचा थरार सुरु आहे. आयसीसी टी-20 विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियाचा संघ भारता विरुद्ध टी-20 मालिका खेळणार आहे. फॉक्स स्पोटर्स डॉट कॉम डॉट एयूच्या रिपोर्टनुसार ऑस्ट्रेलियाचा संघ टी-20 मालिका खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर येणार ( Australia tour of India ) आहे. भारतीय क्रिकेट संघ सप्टेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका ( Ind vs Aus three-match T20 series ) खेळणार आहे.
ही मालिका ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये होणार्या टी-20 विश्वचषकाच्या तयारीसाठी ( Preparations for the T20 World Cup ) असेल. पुढील वर्षी ऑस्ट्रेलियाला फेब्रुवारी-मार्चमध्ये चार कसोटी सामन्यांसाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. भारतीय संघाला 9 ते 19 जून दरम्यान दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळायची आहे.
-
UPDATE 👇
— Fox Cricket (@FoxCricket) May 10, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
It's going to be a wild ride for the Aussie men >>> https://t.co/3T0NGMKwUX pic.twitter.com/cy0uaDGcmQ
">UPDATE 👇
— Fox Cricket (@FoxCricket) May 10, 2022
It's going to be a wild ride for the Aussie men >>> https://t.co/3T0NGMKwUX pic.twitter.com/cy0uaDGcmQUPDATE 👇
— Fox Cricket (@FoxCricket) May 10, 2022
It's going to be a wild ride for the Aussie men >>> https://t.co/3T0NGMKwUX pic.twitter.com/cy0uaDGcmQ
भारतीय संघ 1 जुलैपासून इंग्लंडविरुद्ध पाचवी आणि शेवटची कसोटी खेळणार आहे, जी कोरोना महामारीमुळे गेल्या वर्षी पुढे ढकलण्यात आली होती. भारताला इंग्लंडविरुद्ध तीन टी-20 आणि तीन एकदिवसीय सामनेही खेळायचे आहेत.
हेही वाचा - IPL 2022 MI vs KKR : विजयानंतर श्रेयसचा मोठा खुलासा, प्लेईंग इलेव्हन निवडण्यात 'या' व्यक्तीचा होता समावेश