ETV Bharat / sports

भारत-दक्षिण आफ्रिका निर्णायक लढतीत पाऊस बनेल का व्हिलन? जाणून घ्या हवामानाचा अंदाज - दक्षिण आफ्रिका निर्णायक लढतीत पाऊस

IND vs SA ODI : टीम इंडिया गुरुवारी दक्षिण आफ्रिकेसोबत तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना भारतानं तर दुसरा सामना दक्षिण आफ्रिकेनं जिंकला होता. आता आजचा सामना जिंकणारा संघ मालिका आपल्या खिशात घालेल.

IND vs SA ODI
IND vs SA ODI
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 21, 2023, 9:49 AM IST

नवी दिल्ली IND vs SA ODI : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना गुरुवारी (२१ डिसेंबर) खेळवला जाणार आहे. हा सामना दक्षिण आफ्रिकेतल्या पार्ल येथील बोलंड पार्क स्टेडियमवर होईल. भारतीय वेळेनुसार दुपारी ४.३० वाजता सामन्याला सुरुवात होईल, तर नाणेफेक ४ वाजता होईल. एडन मार्करम दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार असेल तर टीम इंडियाचं नेतृत्व केएल राहुलकडं असेल. तुम्हाला हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि डिस्ने प्लस हॉटस्टारवर थेट पाहता येऊ शकतो.

मालिका १-१ ने बरोबरीत : या ३ सामन्यांच्या मालिकेतील आतापर्यंत २ सामने खेळले गेले आहेत. पहिल्या सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेचा ८ गडी राखून पराभव केला होता. तर दुसऱ्या सामन्यात भारताला दक्षिण आफ्रिकेकडून पराभव स्वीकारावा लागला. आता ही मालिका १-१ अशी बरोबरीत आहे. आजचा सामना जिंकणारा संघ २-१ ने मालिका जिंकेल.

साई सुदर्शनचे दोन्ही सामन्यात अर्धशतक : भारतासाठी पहिल्या सामन्यात अर्शदीप सिंगनं ५ आणि आवेश खाननं ४ विकेट्स घेतल्या होत्या. मात्र दुसऱ्या सामन्यात ते आपल्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये दिसले नाहीत. दुसरीकडं, या मालिकेत पदार्पण करणाऱ्या साई सुदर्शननं दोन्ही सामन्यात अर्धशतकं झळकावली आहेत. याशिवाय, दक्षिण आफ्रिकेकडून टोनी डी झॉर्झीनं शानदार शतक झळकावलं.

खेळपट्टीचा अहवाल : बोलंड पार्कची खेळपट्टी फलंदाजांसाठी उपयुक्त आहे. या मैदानावर सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना मदत मिळते. मात्र चेंडू जुना झाल्यावर स्विंग आणि सीम दोन्ही गायब होतात. इथं फिरकीपटूंना मदत कमी असली, तरी आज त्यांनाही मदत मिळणं अपेक्षित आहे. अशा स्थितीत सेट झाल्यानंतर फलंदाज सहज मोठी धावसंख्या उभारू शकतो.

सामन्यावर पावसाचं सावट आहे का : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील या सामन्यावर पावसाचं सावट नाही. या सामन्यात पावसाची शक्यता जवळपास नाही. अशा परिस्थितीत बोलंडमधील चाहत्यांना दोन्ही संघांमध्ये संपूर्ण सामना बघायला मिळू शकतो. हा सामना सायंकाळी होणार असल्यानं खेळाडूंना उकाडा जाणवणार नाही.

दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग ११ :

भारत - केएल राहुल (यष्टीरक्षक/कर्णधार), ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, तिलक वर्मा, संजू सॅमसन, रिंकू सिंह, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, आवेश खान, कुलदीप यादव, मुकेश कुमार.

दक्षिण आफ्रिका - टोनी डी झोर्झी, रिझा हेंड्रिक्स, रॅसी व्हॅन डर ड्युसेन, एडन मार्करम (कर्णधार), हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), डेव्हिड मिलर, विआन मुल्डर, केशव महाराज, नांद्रे बर्गर, लिझाद विल्यम्स, ब्यूरन हेंड्रिक्स.

हे वाचलंत का :

  1. भारतीय खेळाडूंची आशियाई क्रीडा स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी, एक नजर या अप्रतिम प्रवासावर
  2. राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर, मोहम्मद शमीला अर्जुन पुरस्कार, 'या' २ खेळाडूंना मिळाला 'खेलरत्न'
  3. बांगलादेशच्या सौम्य सरकारनं मोडला सचिन तेंडुलकरचा १४ वर्ष जुना विक्रम

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.