कटक: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका ( IND vs SA ) संघात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दुसरा सामना कटक येथील बाराबत्ती स्टेडियमवर आज (रविवारी) खेळला जाणार आहे. या सामन्याला संध्याकाळी सातला सुरुवात होईल. तत्पुर्वी दोन्ही संघाचे कर्णधार ऋषभ पंत आणि टेम्बा बावुमा यांच्यात नाणेफेक पार पडली. पुन्हा दक्षिण आफ्रिका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय ( South Africa opt to bowl ) घेतला आहे.
-
South Africa have won the toss and will bowl first against #TeamIndia in the 2nd T20I.@Paytm #INDvSA pic.twitter.com/tXHUu1MyXJ
— BCCI (@BCCI) June 12, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">South Africa have won the toss and will bowl first against #TeamIndia in the 2nd T20I.@Paytm #INDvSA pic.twitter.com/tXHUu1MyXJ
— BCCI (@BCCI) June 12, 2022South Africa have won the toss and will bowl first against #TeamIndia in the 2nd T20I.@Paytm #INDvSA pic.twitter.com/tXHUu1MyXJ
— BCCI (@BCCI) June 12, 2022
सध्या सुरु असलेल्या मालिकेतील पहिला सामना भारतीय संघाने गमावला आहे. त्यामुळे भारतीय संघ पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने अशा फरकाने पिछाडीवर आहे. कारण पहिल्या सामन्यात भारतीय संघाला दक्षिण आफ्रिका संघाकडून 7 विकेट्सने पराभव स्विकारावा लागला. त्यामुळे आजचा सामना भारताच्या दृष्टीने खुप महत्वाचा आहे. परंतु भारतीय संघाने आजच्या सामन्यासाठी संघात कोणताही बदल केला नाही. मात्र दक्षिण आफ्रिकेने आपल्या संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल केले आहेत.
भारताने पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी20 मध्ये सर्वोच्च धावसंख्या बनवली होती. ज्यामध्ये बहुतांश फलंदाजांनी चांगली कामगिरी केली. गोलंदाजांनीही चांगली गोलंदाजी केली असली, तरी विकेट घेण्यावर गोलंदाजांना फारसा जोर देता आला नाही. भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, हार्दिक पंड्या आणि अक्षर पटेल या खेळाडूंना फलंदाजांनी क्लीन बोल्ड केले. कर्णधार पंतलाही आपल्या गोलंदाजी आक्रमणाचा योग्य वापर करावा लागेल. कारण मागील सामन्यातील महत्त्वाच्या मधल्या षटकांमध्ये युझवेंद्र चहलला ( Spinner Yuzvendra Chahal ) गोलंदाजी न करण्याच्या त्याच्या निर्णयावर अनेक तज्ञ खूश नव्हते
-
A look at the Playing XI for the 2nd T20I.
— BCCI (@BCCI) June 12, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Live - https://t.co/fLWTMjhyKo #INDvSA @Paytm https://t.co/CHnUIyzxlS pic.twitter.com/WGoEuX8X2m
">A look at the Playing XI for the 2nd T20I.
— BCCI (@BCCI) June 12, 2022
Live - https://t.co/fLWTMjhyKo #INDvSA @Paytm https://t.co/CHnUIyzxlS pic.twitter.com/WGoEuX8X2mA look at the Playing XI for the 2nd T20I.
— BCCI (@BCCI) June 12, 2022
Live - https://t.co/fLWTMjhyKo #INDvSA @Paytm https://t.co/CHnUIyzxlS pic.twitter.com/WGoEuX8X2m
भारत (प्लेइंग इलेव्हन): इशान किशन, रुतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (कर्णधार), हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल आणि आवेश खान.
दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): टेम्बा बावुमा (कर्णधार), रीझा हेंड्रिक्स, रॅसी व्हॅन डर डुसेन, डेव्हिड मिलर, हेनरिक क्लासेन (डब्ल्यू), ड्वेन प्रिटोरियस, वेन पारनेल, केशव महाराज, तबरेझ शम्सी, कागिसो रबाडा आणि अॅनरिक नॉर्टजे.
हेही वाचा - Star Runner Hima Das : आशियाई क्रीडा स्पर्धेत 400 मीटरमध्ये हिमाला करायचे आहे पुनरागमन करायचे