ETV Bharat / sports

Cricket World Cup 2023 IND Vs BAN : भारतानं उडवला बांगलादेशचा धुव्वा, कोहलीनं केला नवा विक्रम - Cricket World Cup 2023 IND vs BAN

Cricket World Cup 2023 IND vs BAN : विश्वचषकात गुरुवारी भारतानं बांगलादेशला धूळ चारत 7 विकेटनं सामना आपल्या नावावर केलाय. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या (MCA) स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. त्यात प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशनं भारताला 257 धावांचं टार्गेट दिलं. मात्र, भारतानं त्यांना 7 विकेटनं मात देत सलग चौथा विजय मिळावलाय.

Cricket World Cup 2023 IND vs BAN
Cricket World Cup 2023 IND vs BAN
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 19, 2023, 1:46 PM IST

Updated : Oct 19, 2023, 10:33 PM IST

पुणे : Cricket World Cup 2023 IND vs BAN : एकदिवसीय विश्वचषकच्या 17 व्या सामन्यात टीम इंडियानं बांगलादेशचा 7 गडी राखून दणदणीत पराभव केलाय. भारताचा या स्पर्धेतील हा सलग चौथा विजय असून टीम इंडिया पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर पोहोचली आहे.

  • #WATCH | Glimpses from the match between India and Bangladesh at Maharashtra Cricket Association Stadium in Pune.

    India won the match by 7 wickets, Virat Kohli (103*) won Player of the Match award.

    (Pics: ANI Photo) pic.twitter.com/tyrjP69rUD

    — ANI (@ANI) October 19, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

विराट कोहलीनं ठोकलं शतक : पुण्याच्या मैदानावर विराट कोहलीनं षटकार ठोकत शतक झळकावलं. विराट कोहलीनं 97 चेंडूत 103 धावांची नाबाद शतकी खेळी केली. रोहित शर्मा बाद झाल्यानंतर विराट कोहलीनं संघाला दिलासा दिला. त्यानं शुभमन गिल, श्रेयस अय्यर, केएल राहुलसोबत महत्त्वपूर्ण भागीदारी केली. विराट कोहलीने 103 धावा करताना 4 षटकार तसंच 6 चौकार ठोकले. केएल राहुलनं 34 धावा करत विराट कोहलीला चांगली साथ दिली.

कोहली सर्वात जलद धावा करणारा खेळाडू : टीम इंडियाने सलग चौथ्यांदा सामना जिंकत 2023 च्या वर्ल्ड कपमध्ये दबदबा कायम ठेवलाय. भारतीय संघाने बांगलादेशचा 7 गडी राखून पराभव केलाय. तर, कोहलीनं त्याच्या वनडे कारकिर्दीतील 48 वे शतक झळकावलंय. तो सर्वात जलद 26 हजार धावा पूर्ण करणारा खेळाडू ठरलाय. त्यानं 567 डावात हा पराक्रम केला आहे. त्याच्या आधी सचिन तेंडुलकरनं 600 डावात हा पराक्रम केला होता.

बांगलादेशच्या सलामीवीरांची चांगली सुरुवात : पुण्यातील एमसीए मैदानावर नाणेफेक जिंकून फलंदाजी करताना बांगलादेशनं 50 षटकांत 8 गडी गमावून 256 धावा केल्या. बांगलादेशच्या सलामीवीरांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. तनजीद हसन तमीम (51 धावा) लिटन दास (66 धावा) यांनी अर्धशतकं झळकावली. यष्टिरक्षक मुशफिकर रहीमनं 38 धावांचं योगदान दिलं. टीम इंडियाकडून जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाने प्रत्येकी 2 बळी घेतले. तर, शार्दुल ठाकूर कुलदीप यादव यांना प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.

पॉवरप्लेमध्ये भारताच्या 63 धावा : 257 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली. भारतीय कर्णधार रोहित शर्मा, शुभमन गिल यांनी अर्धशतकी भागीदारी केली. दोघांनी 76 चेंडूत 88 धावांची सलामी भागीदारी केली. रोहित, गिलच्या जोडीने पहिल्या 10 षटकात 63 धावा केल्या.

बांगलादेशनं केल्या 256 धावा : बांगलादेशनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 8 गडी गमावून 256 धावा केल्या. बांगलादेशाच्या सलामीच्या जोडीनं बांगलादेशला चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या विकेटसाठी त्यांनी 93 धावांची भागीदारी केली. मात्र यानंतर भारतीय गोलंदाजांनी मधल्या षटकांमध्ये अप्रतिम गोलंदाजी करत बांगलादेशला बॅकफूटवर नेलं. बांगलादेशनं नियमित अंतरानं विकेट गमावल्या. फलंदाजीसाठी अनुकूल खेळपट्टीवर त्यांना केवळ 256 धावा करता आल्या. बांगलादेश 300+ धावा करेल असं वाटत होतं, पण त्यांना 256 धावाच करत आल्या. बांगलादेशकडून सलामीवीर लिटन दासनं 66 धावांची तर तनजीद हसननं 51 धावांची खेळी खेळली.

हेही वाचा -

  1. IND vs BAN : हार्दिक पंड्या स्कॅनसाठी रुग्णालयात, पांड्या गोलंदाजी करणार का?
  2. World Cup 2023 : दुखापतींमुळं पाकिस्तान संघाची चिंता वाढली, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सान्यात पाकिस्तान संघाचा काय आहे जुगाड?
  3. Cricket World Cup २०२३ IND vs BAN : दुखापतीमुळं हार्दिक पंड्या मैदानाबाहेर; विराट कोहलीनं पूर्ण केलं षटक

Last Updated : Oct 19, 2023, 10:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.