माउंट मौनगानुई - आयसीसी महिला विश्वचषक ( ICC Women's World Cup ) स्पर्धेतील सहावा सामना पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलिया महिला संघाने पाकिस्तानवर 7 विकेट्सने ( Pakistan lost by 7 wickets ) विजय मिळवला. पाकिस्ताने संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटतकांत 6 बाद 190 धावा केल्या होत्या. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाला 191 धावांचे लक्ष्य मिळाले होते. ऑस्ट्रेलियाने प्रत्युत्तर देताना ऑस्ट्रेलियाने 34.4 षटकांत 3 बाद 194 धावा करत लक्ष्य पूर्ण केले. त्यामुळे पाकिस्तानला या स्पर्धेतील दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागेल.
-
Two in two for Meg Lanning’s side as Australia seal a seven-wicket win over Pakistan 👏#CWC22 pic.twitter.com/OM0SI0G5IQ
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) March 8, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Two in two for Meg Lanning’s side as Australia seal a seven-wicket win over Pakistan 👏#CWC22 pic.twitter.com/OM0SI0G5IQ
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) March 8, 2022Two in two for Meg Lanning’s side as Australia seal a seven-wicket win over Pakistan 👏#CWC22 pic.twitter.com/OM0SI0G5IQ
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) March 8, 2022
महिला विश्वचषक स्पर्धेतील सहाव्या सामन्यात ऑस्ट्रेलियाची कर्णधार मेग लॅनिंगने ( Australia captain Meg Lanning ) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तसेच पाकिस्तान संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. या सामन्यात पाकिस्तानची सुरुवात अतिशय खराब झाली. पाकिस्ताने आपली पहिला विकेट 11 धावसंख्येवर गमावली. ज्यामध्ये सलामी फलंदाज सिद्रा अमिन (9) धावांवर बाद झाली. त्यानंतर ही पाकिस्तान संघाची पडझड सुरुच राहिली. मात्र कर्णधार बिस्माहा मारुफने एक बाजू संभाळताना पाकिस्तान कडून सर्वाधिक धावा केल्या. तिने 122 चेंडूत 78 धावांची खेळी केली.
-
Alyssa Healy's fifty and Alana King's sizzling spell helped Australia make it two victories in two at #CWC22 👏 #AUSvPAK report 👇 https://t.co/pB7LY8jHJG
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) March 8, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Alyssa Healy's fifty and Alana King's sizzling spell helped Australia make it two victories in two at #CWC22 👏 #AUSvPAK report 👇 https://t.co/pB7LY8jHJG
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) March 8, 2022Alyssa Healy's fifty and Alana King's sizzling spell helped Australia make it two victories in two at #CWC22 👏 #AUSvPAK report 👇 https://t.co/pB7LY8jHJG
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) March 8, 2022
त्याचबरोबर अलिया रियाझने देखील शानदार खेळी ( Alia Riaz's brilliant play ) केली. तिने 109 चेंडूचा सामना करताना 53 धावांची खेळी साकारली. परंतु पाकिस्तानच्या इतर कोणत्याच फलंदाजांनी चांगली कामगिरी न केल्याने, पाकिस्तानचा डाव 6 बाद 190 धावांवर संपुष्टात आला. ऑस्टेलिया कडून शानदार गोलंदाजी करताना अलाना किंग ने सर्वाधिक 2 विकेट घेतल्या. तसेच जोनासेन वगळता इतर सर्व गोलंदाजांनी प्रत्येकी एक विकेट्स घेतली.
दरम्यान 191 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलिया संघाने पहिल्या विकेट्साठी शानदार 60 धावांची भागीदारी केली. त्यानंतर रेचल हेंस 34 धावा काढून बाद झाली. तसेच पाकिस्तानच्या दमदार समाचार घेताना एलिसा हेलीने 72 धावांची खेळी साकारली. त्याचबरोबर मेग लॅनिंगने देखील छोटेखानी 35 धावांची खेळी केली. त्यानंतर एलिसा पेरी (26*) और बेथ मूनी (23*) यांनी ऑस्ट्रेलिया संघाचा विजय निश्चित केला. ओमायमा सोहेलने 2 ( Omaima Sohail 2 wickets )आणि नशरा संधून पाकिस्तान कडून गोलंदाजी करताना विकेट्स घेतल्या.