मुंबई - जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. १८ ते २२ जून दरम्यान होणारा हा सामना इंग्लंडमधील साऊथम्पटनच्या मैदानावर खेळवला जाईल. दोन बलाढ्य संघात हा सामना होणार आहे. या सामन्याआधी दोन्ही संघाचे पाठिराखे आपलाच संघ विजयी होणार असा दावा करत आहे. पण या दरम्यान, आम्ही तुम्हाला विजेत्या संघाला किती रक्कम बक्षीस म्हणून दिली जाणार याची माहिती देणार आहोत.
आयसीसीने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या विजेत्याला मिळणारी बक्षीस रकमेची घोषणा केली आहे. आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्योफ एलार्डिस यांनी या बक्षीस रकमेची घोषणा केली. त्यांनी सांगितलं की, जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या विजेत्याला १.६ अमेरिकन बिलियन डॉलर्सचे बक्षीस दिले जाणार आहे. जर भारतीय रुपयात याची किंमत करायची झाल्यास ती जवळपास ११ कोटी ७० लाख रुपये इतकी होते. उपविजेत्या संघाला ०.८ अमेरिकन डॉलर्स बक्षीस म्हणून दिलं जाणार आहे.
सामना रद्द झाला किंवा अनिर्णित राहिला तर...
इंग्लंडमध्ये जून महिन्यात पावसाला सुरूवात होते. याची शक्यता असल्याने आयसीसीने अंतिम सामन्यासाठी एक राखीव दिवस ठेवला आहे. पण तरीही अंतिम सामना अनिर्णित राहिला तर संघाना किती बक्षीस मिळणार? सामना अनिर्णित राहिल्यास दोन्ही संघांना संयुक्त विजेता घोषित करण्यात येईल. असे झाल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी १.२ अमेरिकन मिलियन डॉलर्सची बक्षीस रक्कम वितरित करण्यात येणार आहे.
हेही वाचा - सुनिल गावसकर यांनी सांगितलं सर्वात आव्हानात्मक खेळपट्टी कोणती होती
हेही वाचा - सचिन तेंडुलकरने केलं रक्तदान, सांगितला जवळच्या व्यक्तीचा आलेला अनुभव