ETV Bharat / sports

जोस बटलर आणि जॅक लीचची इंग्लंड संघात वापसी, अंतिम कसोटीत जेम्स अँडरसनला विश्रांती? - Jos Buttler

भारताविरुद्धच्या पाचव्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडने आपल्या संघात बदल केला आहे. जोस बटलर आणि जॅक लीच यांची संघात वापसी झाली आहे. दरम्यान, इंग्लंडचा संघ मालिकेत 2-1 ने पिछाडीवर आहे.

eng vs ind :  Jos Buttler, Jack Leach return to England squad for final Test
स बटलर आणि जॅक लीचची इंग्लंड संघात वापसी, अंतिम कसोटीत जेम्स अँडरसनला विश्रांती?
author img

By

Published : Sep 7, 2021, 10:00 PM IST

लंडन - भारताविरुद्धच्या पाच कसोटी सामन्याच्या मालिकेत इंग्लंडचा संघ 2-1 ने पिछाडीवर आहे. यामुळे इंग्लंडने पाचव्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यासाठी संघात मोठा बदल केला आहे. पाचव्या सामन्यात यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलर आणि फिरकीपटू जॅक लीच याचा इंग्लंड संघात समावेश करण्यात आला आहे.

जोस बटलरच्या पत्नीने बाळाला जन्म दिला. त्यामुळे जोस बटलरने चौथ्या कसोटी सामन्यातून माघार घेतली होती. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने निवेदनात सांगितलं की, चौथ्या कसोटी सामन्यासाठी संघात समावेश करण्यात आलेला सॅम बिलिंग्ज काउंटी संघासोबत जोडला गेला आहे.

दरम्यान, इंग्लंड संघाने 2017 पासून मायदेशात भारताविरुद्ध खेळताना मालिका गमावलेली नाही. पण सुरू असलेली मालिका गमवण्याची भिती त्यांना निर्माण झाली आहे. यामुळे यजमान इंग्लंडचा संघ दबावात आहे.

पहिले चार कसोटी सामने खेळलेला वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन याला पाचव्या सामन्यात विश्रांती देण्यात येऊ शकते. त्याच्या जागेवर मार्क वूडला अंतिम संघात स्थान मिळण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, उभय संघातील पाचव्या सामन्याला 10 सप्टेंबरपासून ओल्ड ट्रेफोर्डमध्ये सुरूवात होणार आहे.

असा आहे इंग्लंडचा संघ -

जो रूट (कर्णधार), मोईन अली, जेम्स अँडरसन, जॉनी बेयरस्टो, रोरी बर्न्स, जोस बटलर, सॅम कुरेन, हसीब हमीद, डॅन लॉरेन्स, जॅक लीच, डेविड मलान, क्रेग ओवरटन, ओली पोप, ऑली रॉबिन्सन, ख्रिस वोक्स आणि मार्क वूड.

हेही वाचा - BCCI ने शेअर केला टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममधील खास व्हिडिओ

हेही वाचा - Eng Vs Ind : चौथ्या कसोटी सामन्यातील पराभव पचवणे कठीण - जो रूट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.