ढाका - ऑस्ट्रेलियाने शनिवारी सलग तीन पराभवानंतर बांगलादेशवर अखेर विजय मिळवला. चौथ्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने बांगलादेशचा 3 गडी राखून पराभव केला. बांगलादेशच्या शेरे बांगला स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत 9 बाद 104 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल ऑस्ट्रेलियाने हे आव्हान 19व्या षटकात पूर्ण केले. पण या सामन्यात डॅनियल ख्रिश्चियन याने शाकिब अल हसनच्या एका षटकात 5 षटकार ठोकले.
ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजी दरम्यान चौथ्या षटकात ही घटना घडली. मेहदी हसन याने पहिल्या षटकात मॅथ्य वेडला बाद केलं. त्यानंतर अनुभवी फलंदाज डॅनियल ख्रिश्चियन फलंदाजीसाठी आला. त्याने पहिल्याच चेंडूवर चौकार खेचत आपले मनसुबे जाहीर केले. चौथ्या षटकात त्याला गोलंदाजी करण्यासाठी शाकिब अल हसन आला. ख्रिश्चियन याने शाकिब अल हसनच्या या षटकात 5 षटकारासह 30 धावा वसूल केल्या.
शाकिबने पहिला चेंडू फ्लाइट चेंडू टाकला. यावर ख्रिश्चियन याने पुढे येत हा चेंडू लाँग ऑनवरुन सीमारेषेच्या बाहेर पाठवला. यानंतर शाकिबने पुढे टप्पा टाकला. यावर ख्रिश्चियनने थांबलेल्या ठिकाणाहून वाइड लाँग ऑनवरुन चेंडू सीमारेषेच्या बाहेर धाडला. यानंतर त्याने आणखी षटकार ठोकला. तेव्हा चौथ्या चेंडू शाकिबने ऑफ स्टम्पवर फेकला. यावर ख्रिश्चियनला फटका मारता आला नाही. यानंतर दोन चेंडूवर ख्रिश्चियन याने आणखी दोन षटकार ठोकले. या कामगिरीसह त्याने यावर्षी होणाऱया टी-20 विश्वकरंडक स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलिया संघातील दावेदारी मजबूत केली.
-
5 SIXES IN AN OVER FROM CHRISTO pic.twitter.com/as8CNCoA9z
— Did Aus win? (@Pacebouncy) August 7, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">5 SIXES IN AN OVER FROM CHRISTO pic.twitter.com/as8CNCoA9z
— Did Aus win? (@Pacebouncy) August 7, 20215 SIXES IN AN OVER FROM CHRISTO pic.twitter.com/as8CNCoA9z
— Did Aus win? (@Pacebouncy) August 7, 2021
हेही वाचा - टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक विजेत्या खेळाडूंना बीसीसीआयकडून मोठं बक्षिस
हेही वाचा - ऑलिम्पिकमध्ये दिले जाणारे सुवर्ण, रौप्य आणि कास्य पदकाची किंमत किती असते? जाणून घ्या